Monday, April 15, 2024

Birth Anniversary | असे अभिनेता जे जेलमधून यायचे शूटिंग करायला, गांधीजींसोबत चळवळीतही झाले होते सामील

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी (Balraj Sahni) त्यांच्या दमदार अभिनयासाठी आणि उत्कृष्ट डायलॉगसाठी ओळखले जातात. बलराज साहनी हे इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होते. अभिनेत्याचे खरे नाव युधिष्ठिर साहनी आहे. बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी ब्रिटिश भारतातील रावळपिंडी येथे झाला. त्या काळात अभिनेत्याने लाहोर विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. तर १३ एप्रिल २९७३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचे निधन झाले. बलराज साहनी यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी…

आपल्या पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी, बलराज साहनी कोणतेही पात्र साकारण्यापूर्वी ते प्रत्यक्षात जगायचे. अशीच एक घटना त्याच्या तुरुंगात जाण्याशीही संबंधित आहे. खरं तर, दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या सांगण्यावरून के. आसिफ यांनी या चित्रपटात बलराज यांना जेलर बनवले. ही भूमिका साकारण्यासाठी अभिनेता आसिफसोबत आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला आणि जेलमधील राहणीमान जाणून घेतले. (balraj sahani death anniversary the actor who used to come from jail to shoot)

Balraj-Sahni
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/Shemaroo Filmi Gaane

चित्रपटातील व्यक्तिरेखा रिअल लाइफमध्येही जगणाऱ्या बलराज साहनी यांना खऱ्या आयुष्यातही तुरुंगात जावे लागेल, हे कोणास ठाऊक होते. एके दिवशी अभिनेत्याला बातमी मिळाली की, परळहून कम्युनिस्ट पक्षाची मिरवणूक निघणार आहे. आणि मग काय! डाव्या विचारसरणीचे समर्थक बलराज आपल्या पत्नीसह त्या मिरवणुकीत सामील झाले. मात्र याच दरम्यान हिंसाचार सुरू झाला. यावेळी बलराज साहनी यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली.

तुरुंगात असलेल्या बलराज यांना बोलवून एके दिवशी जेलरने त्यांना कुठेतरी पाहिले असल्याचे सांगितले. त्या वेळी आसिफही तिथेच बसले होते. आसिफ यांच्या सांगण्यावरून जेलरने त्यांना तुरुंगात असताना शूट करण्याची परवानगी दिली. अभिनेते सकाळी शूटिंगला जायचे आणि संध्याकाळी तुरुंगात परतायचे. सुमारे ३ महिने तुरुंगात असताना त्यांनी ‘हलचल’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते.

बलराज साहनी चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही सक्रिय होते. १९३८ मध्ये त्यांनी महात्मा गांधींसोबत मिळून काम केले. त्यानंतर बीबीसी लंडन हिंदीमध्ये काम करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. बलराज साहनी यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, म्हणून ते इंडियन पीपल थिएटरमध्येही रुजू झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा