हिंदी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी येत आहेत. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) अभिनेते बलविंदर सिंग धामी यांचे निधन झाले आहे. बलविंदर यांनी अनेक सिनेमात काम केले आणि त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले. २६ नोव्हेंबर शुक्रवार रोजी बलविंदर सिंग यांनी शेवटचा श्वास घेतला. बलविंदर सिग यांनी चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमात त्यांचा ठसा उमटवला होता. बलविंदर यांनी ९० च्या दशकात अनेक मालिका आणि सिनेमे केले.

बलविंदर सिंग १९९१ ‘हफ्ता बंधन’ सिनेमात दिसले होते. याशिवाय त्यांनी ‘सैनिक’, ‘दुर्घटना’, ‘जण तेरे नाम’, ‘परवाने’, ‘इना मीना डिका’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच ते झी टीव्हीवरील ‘झी हॉरर शोच्या काही भागातही दिसले होते. सैनिक सिनेमात त्यांनी अक्षय कुमार, अनुपम खेर यांच्यासोबत काम केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा
-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर