‘बाप जी’ चित्रपटातील खेसार लालच्या ‘मच्छरिया’ गाण्याचा यूट्यूबवर राडा; एकदा पाहाच धमाकेदार व्हिडिओ


भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव हा नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील त्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. याच कारणाने प्रेक्षक त्याच्या प्रत्येक गाण्याला भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच भोजपुरीमधील सर्वात चर्चित चित्रपट ‘बाप जी’ मधील ‘मच्छरिया’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. मच्छरिया या गाण्याचा व्हिडिओ वर्ल्ड वाईड रेकॉर्ड भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केला आहे. या गाण्यात खेसारी लाल आणि काजल राघवानीची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या गाण्यामध्ये काजल सिल्वर कलरचा लेहंगा घालून खूपच आकर्षक दिसत आहे. या गाण्याला ज्याप्रकारे चित्रित केले आहे ते पाहून प्रेक्षकांना हे गाणे खूपच आवडले आहे.

या व्हिडिओमध्ये दोघांचाही लुक आणि ड्रेस खूपच सुंदर आहे. हे एक पार्टी साँग आहे.‌ या गाण्यामध्ये खेसारी लाल म्हणतो की, “मकई की रोटीया पर आजा बनके मच्छरिया ओ.” याचे कारण म्हणजे या गाण्यात काजलने जो ड्रेस घातला आहे तो माश्यासारखा दिसत आहे. यामुळे खेसारी लाल तिला मच्छरिया म्हणत आहे. हे गाणे खेसारी लाल आणि खुशबू तिवारी केटी यांनी गायले आहे. प्यारे लाल यादव यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर ओम झा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. (Bap ji movies Machhriya song release on YouTube)

वर्ल्ड वाईड रेकॉर्ड भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवरून ‘बाप जी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये बाप लेकाची एक अनोखी कहाणी दाखवली आहे. मुलाच्या भूमिकेत खेसारी लाल, तर मनोज टायगर हे पिताच्या भूमिकेत दिसत आहेत. रामजी जयसवाल हे ‘बाप जी’ या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर देव पांडेय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. श्यामजीत बरई हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अरबिंद तिवारी हे या चित्रपटाचे लेखक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’मध्ये अरुणिता कांजिलालचा परफॉर्मन्स पाहून सोनू कक्कर झाली इंप्रेस; दिली ‘ही’ खास भेट

-अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली नात्याची पहिली ऍनिवर्सरी; बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल प्रेरित; सोबतच ‘या’ सत्याचाही केला तिने उलगडा


Leave A Reply

Your email address will not be published.