क्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल प्रेरित; सोबतच ‘या’ सत्याचाही केला तिने उलगडा


बॉलिवूडमध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगला वावर असतो. तिच्या लूकसोबतच तिच्या फिटनेसमुळे ती खूप चर्चेत असते. तिच्या बॉडीला फिट ठेवण्यासाठी ती कितीतरी तास जिममध्ये घाम गळताना दिसते. याचे दर्शन आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्ट वरून येतच असतं. नुकताच तिने जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सोबतच तिने एक खरी गोष्ट देखील प्रेक्षकांना सांगितली आहे.

क्रिती सेननने इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ती खूप गंभीर होऊन वर्क आऊट करताना दिसत आहे. काळ्या रंगाचा ड्रेस घालून ती वेट लिफ्टिंग, डेड लिफ्ट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही प्रेरित होईल. परंतु दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने सत्य सांगितले आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले की, “लेग डे आणि मी. आशावाद वर्सेस वास्तविकता किंवा इंस्टाग्राम वर्सेस सत्य.”

दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती वर्कआऊट बद्दल बोलताना दिसत आहे. तिचे पाय आणखी सुंदर बनवण्यासाठी ती स्क्वाॅट करत सांगते की, तिला हे अजिबात आवडत नाही. तिची जिम ट्रेनर यास्मिन कराचीवाला हिच्याकडे ती याबाबत तक्रार देखील करते. तिला हे अजिबात करायचे नाही. कधी ती पाणी पिण्यासाठी ब्रेक घेते. ती व्हिडिओमध्ये जिमबद्दल सिरियस असल्याबद्दल बोलत आहे. ( Kriti sanon share her work out video on social media)

तिचे हे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. सगळेजण या व्हिडिओवर कमेंट करून कौतुक करत आहेत. कोणी तिला “बॉलिवूड क्विन” म्हणत आहे तर कोणी म्हणत आहे, “तिला इतका वर्क आऊट नका करायला सांगू ती खूपच बारीक झाली आहे.”

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘आदीपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. या सोबतच ती अक्षय कुमारसोबत‌ ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.