Saturday, August 2, 2025
Home अन्य ‘जुनं ते सोनं,’ म्हणत बप्पी लहरींची ‘ही’ होती सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट

‘जुनं ते सोनं,’ म्हणत बप्पी लहरींची ‘ही’ होती सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट

गायक बप्पी लहरी यांच्या निधनाने संपूर्ण सिने सृष्टी दुःखात आहे. त्यांचे मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रोजी निधन झाले. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक आठवडाआधी त्यांनी त्यांचा एक जुना फोटो पोस्ट केला होता.

बप्पी लहरी यांनी इंस्टाग्रामवर त्यांचा एक जुना मोनोक्रोम फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते काळजीत दिसत होते. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले होते की, “जुनं ते सोनं.” त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होता. (Bappi Lahiri’s last post on Instagram before death)

बप्पी लहरी हे ७० – ८० दशकातील पॉपस्टार होते. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहे. त्यांनी ‘बंबई से आया मेरा दोस्त’, ‘आय एम ए डिस्को डान्सर’, ‘जूबी जूबी’, ‘याद आ रहा है तेरा प्यार’, ‘यार बिना चैन कहा रे’, यांसारखी गाणी गायली आहेत.

बप्पी लहरी जिथे कुठे जातील तिथे अंगावर लाखो रुपयांचे सोने परिधान करून जायचे. बप्पी लहरी यांचे नाव ऐकताच सगळ्यांना आठवते ते त्यांचे सोने. त्यांच्याकडे ४० लाख रुपयांचे सोने होते. त्यांच्याकडे अजून ७५२ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी आहे. गायक असाण्यासोबतच ते एक चांगले राजनेते देखील होते.

त्यांनी २०१४ साली लोकसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या संपत्तीची माहिती दिली होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या संपत्तीबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या कदे लाखो रुपयांचे सोने होते. या वर्षीच त्यांनी सोन्याचा कप प्लेट खरेदी केला होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्याकडे खूप सोने आहे. ते एकूण २० कोटी संपत्तीचे मालक आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा