अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल त्यांच्या व्यवसायिक आयुष्यासाेबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर आता या जाेडप्यांनी त्यांच्या नात्याला एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. आता अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे, ज्यामध्ये केएल राहुलने बीसीसीआयची सुट्टी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, अलीकडेच क्रिकेटपटू केएल राहुल (kl rahul) याने बीसीसीआयकडे वैयक्तिक कारणास्तव सुट्टी मागितली आहे, ज्याला बोर्डाने मान्यता दिली आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, क्रिकेटरने जानेवारी 2023 मध्ये त्याच्या वैयक्तिक सुट्टीचे नियोजन केले आहे आणि या दरम्यान तो त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (athiya shetty) हिच्यासोबत लग्न करू शकतो.
अलीकडेच माध्यमातील वृत्तांमध्ये, दावा करण्यात आला की, अभिनेत्री अथिया शेट्टी-केएल राहुलसाेबत जानेवारी 2023 मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या खंडाळ्यातील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर मुलीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांचा एक व्हिडिओ यापूर्वी समोर आला होता, ज्यामध्ये ते अथिया शेट्टीच्या लग्नाशी संबंधित पॅपराझीनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिसले हाेते. खरं तर, सुनील शेट्टी त्याच्या आगामी क्राईम वेब सीरिज ‘धारावी बँक’च्या लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचले होते, जिथे पॅपराझीने अभिनेत्याला अथिया आणि केएल राहुलचे लग्न कधी होणार असे विचारले, ज्यावर त्यांनी उत्तर देत म्हणटले की, “लवकरच.”
मिळालेल्या माहितीनुसार, अथिया-केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. अथियाने अनेकदा केएल राहुलसोबतचे तिचे नाते अफवा असल्याचे म्हटले असले तरी सुनील शेट्टी यापूर्वीही त्यांच्या लग्नाबद्दल बोलले आहे. या अभिनेत्याने सांगितले की, “जेव्हा दोघेही आपापल्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करतील तेव्हाच ते लग्न करतील. लग्न ही काही एका दिवसाची गोष्ट नाही.”
आथियाच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने 2015 मध्ये ‘हीरो’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने सूरज पांचाेलीसाेबत मुख्य भूमिका सााकरली हाेती. मात्र, अथियाच्या या चित्रपटाला बाॅक्स ऑफीसवर विशेष प्रतिसाद मिळाला नाही. आथिया शेवटची 2019मध्ये आलेला ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात दिसली हाेती. ( bcci approves kl rahul leave will athiya shetty and kl rahul get married in january)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळला
‘मला तर वाटतं ही…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने ‘तसले’ फोटो शेअर करताच भडकले युजर्स