Sunday, December 8, 2024
Home अन्य दाढी-मिशा असणारी जगातील पहिली मुलगी, वाचा तिची प्रेरणादायी कहाणी

दाढी-मिशा असणारी जगातील पहिली मुलगी, वाचा तिची प्रेरणादायी कहाणी

एखादी स्त्री म्हटले की, डोळ्यासमोर येते म्हणजे तिचे काळे केस, समोरच्याला घायाळ करतील असे डोळे, कमनीय बांधा आणि एकूणच सौंदर्य. पण मंडळी जर आम्ही असे म्हटले की, अशी एक मुलगी आहे, जिला दाढी- मिश्या आहेत, तर तुमचा या गोष्टीवर कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. होय, एकेकाळी आपल्या नको असलेल्या शरीरावरील केसांमुळे प्रचंड ट्रोल झालेली हीच मुलगी, अलीकडच्या काळात इतर अनेक मुलींसाठी मोठी प्रेरणा बनली. ती म्हणजेच हरनाम कौर. चला तर जाणून घेऊया प्रेरणादायी हरनामबद्दल.

सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग मिळवण्यापासून ते इंस्पिरेशनल स्पीकर बनण्यापर्यंत तसेच मासिकाच्या मुखपृष्ठावर येण्यापर्यंत, हरनामने हे सिद्ध केले आहे की, जर एखाद्यामध्ये इच्छाशक्ती असेल आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारले, तर जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही.

एवढा मोठा पल्ला गाठणारी इंग्लंडमध्ये जन्मलेली हरनाम जेव्हा फक्त ११ वर्षांची होती, तेव्हा तिच्या रिपोर्ट्सवरून तिला पीसीओएस (PCOS) असल्याचं समोर आलं. आता तुम्ही म्हणाल हे पीसीओएस म्हणजे काय? तर पीसीओएस म्हणजे पॉली सिस्टिक ओवारीज सिंड्रोम. हा आजार हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो. यामुळेच हरनामच्या शरीरात वेगवेगळे बदल दिसू लागले. प्रथम तिच्या चेहऱ्यावर दाट केस येऊ लागले आणि नंतर छाती- पाठ आणि इतर भागांवरही ते दिसू लागले. यामुळे तिला शाळेतच नाही, तर वाटेतही लोकांचे टोमणे सहन करावे लागले.

आता एवढं कोण सहन करणार ना. अंगावरील केस, लोकांचे टोमणे, प्रश्न यामुळे हरनाम वैतागली होती. ती १६ वर्षांची होती, जेव्हा एका व्यक्तीने तिला इंटरनेटवर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. यामुळे तिच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. डिप्रेशन म्हणजे फार वाईट बरं का. भले- मोठे बॉलिवूड कलाकारही डिप्रेशनचे शिकार झालेले आपण पाहिले आहेत. वाढत्या केसांच्या लाजिरवाणेपणामुळे तिने घराबाहेर पडणे बंद केले. या सर्व प्रकारामुळे स्वत:चा जीव देण्याचा विचारदेखील तिच्या मनात अनेकदा आला होता.

पुरुषांसारखे केस लपवण्यासाठी हरनाम वॅक्सिंग ते ब्लीचिंगचा अवलंब करायची. पण हळूहळू तिच्यात निर्माण झालेली न्यूनगंडाची भावना दूर करून ती स्वत:ला स्वीकारू लागली. तिने दाढी लपवण्याऐवजी ती नैसर्गिकरीत्या वाढू दिली आणि अशाप्रकारे ती आत्मविश्वासाने सर्वांसमोर जाऊ लागली. लोक तिला प्रश्न विचारायचे आणि तिची टिंगल करायचे, पण या सगळ्यांसमोर लाज वाटून घेणे हरनामने आता सोडले होते.

असाधारण काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अनेकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाते. हरनामनंही जगावेगळा विक्रम केला. ती संपूर्ण चेहऱ्यावर दाढी असलेली पहिली महिला ठरली. यासाठी २०१७ मध्ये तिचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.

यानंतर भारतीय वंशाची ही ब्रिटीश मुलगी मॉडेलिंग जगतात आल्यापासून शरीर सकारात्मकतेबद्दल बोलताना दिसते. ती अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स आणि अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावरदेखील झळकली आहे.

हरनामने नुकताच ब्रिटीश काऊन्सिल युथ सिलेक्ट कमिटीचा सोशल मीडिया आणि बॉडी इमेजवर रिपोर्ट पूर्ण केला. तिने २०१७ आणि २०१८च्या स्टायलिस्ट इव्हेंट्समध्ये २००० हून अधिक लोकांशी चर्चा केली. यासोबतच तिने ल्यूश एचक्यू येथे बॉडी पॉझिटिव्ह इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते. मंडळी हरनामच्या या इव्हेंटला पहिल्याच रात्री १२००० हून अधिक प्रेक्षक लाभले होते. तिने चॅनेल ५च्या हाऊस ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी पीपलवर हजेरीदेखील लावली. ती कॉस्मोपॉलिटन, ग्लॅमर, टीन वोग, ग्राझिया, पोर्टर मॅगझिन आणि इतर अनेक प्रकाशनांमध्ये देखील दिसली आहे.

हेही पाहा- चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोल होणारी हरनाम बनलीय मुलींसाठी प्रेरणा

अशा या हरनामने यशाची शिखरे गाठत जावी आणि मनात कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा