छोट्या अन् मोठ्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रींनी साकारली होती ‘सीता’ची भूमिका; आता पुढचा नंबर कंगनाचा


बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौतचा नुकताच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात कंगनाने मोठ्या पडद्यावर तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर कंगना लवकरच ऐतिहासिक चित्रपटात प्रभू श्रीराम यांची पत्नी सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा तोच चित्रपट आहे, ज्यात अभिनेत्री बेबी उर्फ करीना कपूर खानने सीतेची भूमिका करण्यासाठी १२ कोटी रुपये मागितल्याचे वृत्त होते. आता ही भूमिका कंगनाला देण्यात आली आहे. ‘सीता- एक अवतार’ नावाचा हा चित्रपट आलुक्य देसाई दिग्दर्शित करणार आहेत. दिग्दर्शक आलुक्य यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

‘या’ अभिनेत्रींनी सीतेची भूमिका साकारली
या यादीत कंगना रणौत एकमेव नाही, जी मोठ्या पडद्यावर सीता मांची भूमिका साकारणार आहे. याआधीही बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पडद्यावर सीता मातेचे पात्र खूप चांगले साकारले आहे. काही कलाकारांनी सीता मातेची भूमिका इतक्या उत्कृष्ट पद्धतीने साकारली की, लोक त्यांना खरी सीता माता मानू लागले. आज या लेखातून त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी पडद्यावर सीता मातेची भूमिका साकारली.

१. दीपिका चिखलिया टोपीवाला
रामानंद सागर यांचे रामायण अजूनही कोणीच विसरू शकले नाही. ३३ वर्षीय दीपिका चिखलिया यांनी या शोमध्ये ‘सीता’ची भूमिका साकारली होती. या पात्रामध्ये, दीपिका यांनी ही भूमिका इतकी सुंदर पद्धतीने साकारली की, लोक खऱ्या जीवनात त्यांची देवाप्रमाणे पूजा करू लागले आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करत होते. आजही दीपिका यांना सीता माता म्हणून ओळखले जाते.

२. देबिना बॅनर्जी
रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर याने २००८ साली रामायणाचे पुनर्निर्माण केले. देबिना बॅनर्जीने या शोमध्ये सीतेची भूमिका साकारली होती. हा शो सुद्धा खूप हिट झाला होता. यासह, देबीनाने मोठ्या पडद्यावर सीता मातेची भूमिका साकारली. यालाही लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली

३. मदिराक्षी मुंडले
साल २०१५ मध्ये ‘सिया के राम’ मध्ये दक्षिण भारतीय अभिनेत्री मदिराक्षी मुंडलेने सीतेची भूमिका साकारली होती. या शोची कथा सीतेच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आली होती. या शोमध्ये सीता म्हणून मदिराक्षीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. मदिराक्षीने या शोमध्ये तिच्या या पात्राला उत्कृष्ट बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

४. शिव्या पठाणिया
साल २०१९ मध्ये पुन्हा एकदा शिव्या पठाणियाने सीता मातेची भूमिका साकारली. मात्र, हा शो राम-सीतेचे पुत्र लव आणि कुश यांच्या दृष्टीकोनातून दाखवण्यात आला. प्रेक्षकांना शोशी जोडण्यात अपयश आले. शिव्याची सीता मातेची भूमिका प्रेक्षकांना आवडली नाही.

५. स्मृती इराणी
तुलसी म्हणून घरोघरी प्रसिद्ध झालेल्या स्मृती इराणी यांनी छोट्या पडद्यावरही सीतेची भूमिका साकारली होती. २००१ मध्ये स्मृती इराणी यांनी बीआर चोप्रा यांच्या ‘रामायण’ मध्ये सीतेची भूमिका साकारली होती, तर ‘श्री कृष्णा’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश भारद्वाज रामच्या भूमिकेत दिसला होता. हे रामायण लोकांना विशेष काही आवडले नाही.

६. रुबीना दिलैक
रुबीना दिलैकने ‘देवों के देव महादेव’ मध्ये सीतेची भूमिका साकारली होती. खरं तर, शोमध्ये रामचा अध्याय दाखवण्यात आला होता, त्यावेळी रुबीनाने पडद्यावर सीतेची भूमिका साकारली होती. टेलिव्हिजनची बॉस लेडी मानल्या जाणाऱ्या रुबीनाला सीता माता म्हणून चांगलीच पसंती मिळाली.

७. देबलिना चॅटर्जी
जेव्हा जेव्हा टीव्हीवर भगवान हनुमानाचा गौरव केला जातो. तेव्हा रामायणाचा नक्कीच उल्लेख केला जातो. टीव्ही शो ‘संकट मोचन महाबली हनुमान’ मध्ये अभिनेत्री देबलीना चॅटर्जी सीतेच्या भूमिकेत दिसली होती. जे प्रेक्षकांनाही खूप आवडले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा


Leave A Reply

Your email address will not be published.