Tuesday, May 21, 2024

बोलताना आपण तारम्य बाळगायला हवं! सुश्मिता सेनच्या पोस्टनंतर ट्रोलर्सला हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन हिने (दि, 19 नोव्हेंबर) रोजी आपला वाढदिवस साजरा केला आहे. तिला सोशल मीडियावरुन अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यापैकीच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखिल सुश्मिताच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने सुश्मिताला दिर्गा असे उच्चारले होते मात्र, तिच्या या पोस्टमुळे तिला सोशल मीडियावर जाम ट्रोल केलं जातंय.

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिले होते की, “हॅपी बर्थडे माय दुर्गा.’ यापूर्वीही तिने अभिनेत्रीचा फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तिने तिचा चेहरा न दाखवत आपल्या भावणा व्यक्त केल्या होत्या. तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “काल मला माझी दुर्गा भेटली. दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही. रवी सरांच्या आगामी web series मध्ये मी जिच्यासोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्या मुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते!”

नुकतंच सुश्मिता सेनची नवीन वेबसिरिज ‘टाली’ यामध्ये ती तृतीयपंथी गौरीची भूमिका साकारणार आहे.त्यासोबतच हेमांगी कवी देखिल या वेबसिरिजमध्ये मुख्या भूमिकेत पाहायला मिळणार असून याचे दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केले आहे. शुटींगदरम्यान हेमांगीला सुश्मितासोबत काम करत असताना चांगले अनुभव आल्यामुळे कदाचित तिने तिला अशाप्रकारे भावना व्यक्त केल्या असतील. मात्र, तिने अभिनेत्रीला दुर्गा का म्हटलं आहे म्हणून तिच्या चाहत्यांना ही गोष्ट खटकली आहे.

 

View this post on Instagram

‘हेमांगी तु खूप चांगली अभिनेत्री आहेस. तु आजपर्यत कोणत्याही भूमिका धमाकेदार पद्धतीन निभावल्या आहेत मात्र, तु जर अशा अभिनेत्रीला देवी दुर्गाचे रुप मानत आहेस जी चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. तिने आजपर्यत अनेक व्यक्तीसोबत संबंध ठेवले आहेत. अशा लफडेबाज बाईला तु दुर्गा मानतेस हे अयोग्य आहे’, अशी भावना हेमांगीच्या चाहत्यांनी व्यक्त केली होती त्यामुळे हेमांगीने फोटो डिलीट केले.

सगळ्य कमेंटपैकी एक कमेंट अशी होती ज्यामुळे हेमांगी देखिल भडकली. त्या व्यक्तीने लिहिले होते की, ‘हेमांगी कवी.. तुमच्या अभिनयाचा मी जबरदस्त फॅन आहे. तुम्ही कोणीतही भूमिका सहज पेलता. पण दोन दिवसांपूर्वी एक फोटो पाहिला. एक हिंदी बी ग्रेड अभिनेत्री समोर तुम्ही नतमस्तक होऊन तिला दुर्गाचा मान दिला. ती अभिनेत्री तुमच्यापेक्षा अभिनयात कच्ची आहे. लफडेबाज.. अव्वल.. गौरी सावंतची भूमिका तिच्यापेक्षा तुम्ही उत्तम निभावली असती. पण हिंदी चित्रपट किंवा वेब सिरिज बोलली की हिंदी स्टार लागतात. ही आपल्या मराठी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे विकृत कारनामे आहेत. पण प्लीज.. कोणापुढे स्वाभिमान घाण ठेवू नका..’

hemangi kavi
Photo Courtesy: Instagram/hemangiikavi
Verified

अशा कमेंटमुळे हमांगीदेखिला राग आला आणि तिनेही परत सडेतोड उत्तर दिले की, , ‘कुणाबद्दल ही बोलताना त्या व्यक्तीने काय केलंय ही नक्की पहावं आणि मग बोलावं! एखादी व्यक्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे (खरतर त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसावं) पण तरीही आवडत नसली तरी बोलताना आपण तारतम्य बाळगायला हवं!’

हेमांगीच्या या पोस्टने सोशल मीडियावर चांगलीत खळखळबळ माजली होती, तिला अनेक चाहत्यांच्या कमेंट येऊलागल्या त्यामुळे अभिनेत्रीने ती पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत जोडो यात्रेमध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्रींनीही लावली हजेरी, व्हायरल होतोय व्हिडिओ
‘रफू चक्कर’सोबत शिवानी अन् विराजसने सुरू केला नवा व्यवसाय, ब्रँडच्या नावाची होतेय जोरदार चर्च

हे देखील वाचा