Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन भारत जोडो यात्रेमध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्रींनीही लावली हजेरी, व्हायरल होतोय व्हिडिओ

भारत जोडो यात्रेमध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्रींनीही लावली हजेरी, व्हायरल होतोय व्हिडिओ

कॉंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये अनेक लोकांनी आणि राजकारण्यांनी सहभाग घेतला होता. आता या यात्रेचा महाराष्ट्रामध्ये आज शेवटचा दिवस आहे. हा प्रवास सुरु होऊन दोन महिने झाले असून महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘भारत जोडो यात्रा’ (Bharat jodo Yatra)  मध्ये सामाजिकच नाहीत तर मनोरंज क्षेत्रातील अनेक कलाकारांनी हजेरी लावत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पाठिंबा दिला होता. पूजा भट्ट (Pooja Bhatt), सुशांत सिंग (Sushant Singh), रिया भास्कर (Ria Bhaskar) सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या यात्रेमध्ये टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) आणि आकांशा पुरी (Akansha Puri) यांनी देखील राहुल गांधी यांच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे.

भारत जोडो यात्रेमध्ये या दोन्ही अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मध्ये राहुल गांधी आणि दोन्हा बाजुंनी या अभिनेत्री सहभागी होताना दिसून येत आहेत. त्याशिवया कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत ट्वीटर अकाउंडवरुन या दोन्ही अभिनेत्रींचा फोटो देखिल शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत असताना कॉंग्रेस पक्षाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी आमच्या सत्याच्या लढाईत सहभागी झाल्या आहेत.’ दोन्ही अभिनेत्रींनी या ट्वीटरला रिट्वीट करत यात्रेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केला आहे.

अभिनेत्रींच्या वर्कफ्रंटबद्दलल बोलायचे झाले तर रश्मी देसाई काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती, यापूर्वी तिने कलर्स टीव्ही वरील ‘उतरन’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. अभिनेत्री आकांशा पुरी हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने नुकतंच ‘मिका दी वोटी’ या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये तिने सगळ्यांना मागे टिकून विजयी पद मिळवले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘रफू चक्कर’सोबत शिवानी अन् विराजसने सुरू केला नवा व्यवसाय, ब्रँडच्या नावाची होतेय जोरदार चर्चा
सुनील शेट्टीने लेक आथिया आणि केएल राहुल बद्दल केला मोठा खुलासा, ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा