Sunday, April 14, 2024

धक्कादायक! बंगाली सिनेसृष्टीत सातत्याने तिसरी आत्महत्या; पल्लवी, बिदिशानंतर आता मंजुषा आढळली लटकलेली

बंगाली चित्रपटसृष्टीतून सातत्याने वाईट बातम्या येत आहेत. अलीकडेच बंगाली अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) नंतर बिदिशा डे मुजुमदार (Bidisha Dey Mujumdar) हिच्या निधनाची बातमी समोर आली होती. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. बिदिशा डेची मैत्रिण आणि बंगाली अभिनेत्री मॉडेल मंजुषा नियोगी (Manjusha Neogi) हिचे शुक्रवारी (२७ मे) निधन झाले. मंजुषाचा मृतदेह तिच्या फ्लॅटवर लटकलेला आढळला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या बंगाली चित्रपटसृष्टीत अशा हृदयद्रावक घटना समोर येण्याचे कारण काय, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते.

कोण आहे मंजुषा नियोगी?
मंजुषा नियोगी ही व्यवसायाने मॉडेल असून, नुकताच या अभिनेत्रीचा मृतदेह पाटोली येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मंजुषाने काही टीव्ही शोमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. ‘कांची’ टीव्ही शोमध्ये ती नर्सच्या भूमिकेत दिसली होती. ती इंडस्ट्रीत तिचं करिअर घडवण्यात व्यस्त होती. (bengali film actress manjusha neogi mysterious death found hanging in her residence)

मैत्रिणीच्या मृत्यूने नैराश्यात गेलती
मंजुषाच्या आईने पोलिसांना सांगितले की, मैत्रिण बिदिशाच्या मृत्यूनंतर ती नैराश्याशी झुंज देत होती. सध्या पोलिसांनी मंजुषाने आत्महत्या केली आहे की, काही गैरकृत्य आहे? याचा तपास सुरू केला आहे.

बेडरूममध्ये सापडला मृतदेह
शुक्रवारी सकाळी मंजुषाचे आई-वडील त्यांच्या मुलीला सतत फोन करत होते. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते काळजीत पडले आणि ते मुलीच्या बेडरूममध्ये पोहचले. यावेळी मुलीचा मृतदेह फासावर लटकलेला होता. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मंजुषाची मैत्रिण बिदिशाने दोन दिवसांपूर्वी केलीय आत्महत्या
बुधवारी (२५ मे) मंजुषाची मैत्रिण बिदिशा डे मजुमदार हिने आत्महत्या केली होती. २१ वर्षीय बिदिशाचा मृतदेह तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या फ्लॅटमध्ये ती तिच्या प्रियकरासोबत राहत होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा