×

धक्कादायक! अवघ्या विसाव्या वर्षी अभिनेत्रीने केली आत्महत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) हिचा मृतदेह कोलकातामधील गरफा येथील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ‘मोन माने ना’ या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री केवळ २० वर्षांची होती. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या बातमीने तिचे सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by mistuu (@pallavidey153)

पल्लवी डेचा मृतदेह तिच्याच घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अभिनेत्रीला बांगूर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तिचे या मोठ्या पावलामागील कारणे शोधण्याचाही पोलिस प्रयत्न करत आहेत. (bengali television actress pallavi dey dies by suicide)

View this post on Instagram

A post shared by mistuu (@pallavidey153)

‘मोन माने ना’मध्ये काम करणारी तिची सह-कलाकार अनामित्रा बताब्याल दोन दिवसांपूर्वीच पल्लवीशी बोलली होती. ती म्हणाली, “मला धक्का बसला आहे. आम्ही १२ मे रोजी टेलिव्हिजन शोसाठी शूटिंग केले आणि नंतर गप्पा मारल्या. मी या बातमीवर विश्वास ठेवू शकत नाही.” टीमच्या आणखी एका सदस्याने सांगितले, “ती दोन दिवसांपूर्वी शूटमध्ये सामील झाली होती आणि आम्हाला माहित नव्हते की, ती दु: खी आहे किंवा नाराज आहे. आमचा अजूनही यावर विश्वास बसत नाही.”

View this post on Instagram

A post shared by mistuu (@pallavidey153)

‘रेशम झंपी’ या टेलिव्हिजन मालिकेत भावुक भूमिका साकारून पल्लवी घराघरात प्रसिद्ध झाली. अभिनेत्री सध्या ‘मोन माने ना’ मध्ये मुख्य भूमिकेत होती, ज्यात सॅम भट्टाचार्य मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री अंजना बसू या शोमध्ये नकारात्मक भूमिका करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post