Wednesday, May 31, 2023

धक्कादायक! २१ वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, चाहत्यांना हादरा

कलाक्षेत्रातून मागील काही दिवसांपासून एकापेक्षा एक धक्कादायक बातम्या, माहिती समोर येत आहे. यातच आज (गुरुवार, २६ मे) रोजी आणखीन एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. प्रसिद्ध मॉडेल आणि नवोदित बंगाली अभिनेत्री बिदीशा डे मुजुमदार (Bidisha De Mujumdar) ही तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे १५ मे रोजी बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिच्या आत्महत्येची बातमी समोर आली होती. या धक्क्यातून बंगाली मनोरंजनसृष्टी अजून सावरलेली नसतानाच त्यांना हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

बिदीशा डे मुजुमदार ही अभिनेत्री अवघ्या २१ वर्षांची होती. ती आपल्या आई वडिलांसोबत भाड्याने एका अपार्टमेंटमध्ये राहात होती. बुधवारी बिदीशा आपल्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

पोलिसांना हि माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हि खरंच आत्महत्या आहे की आणखीन काही, याचा तपास सुरु केला आहे. मात्र, सध्या ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. बिदीशा डे मुजुमदार ही लोकप्रिय बंगाली मॉडेल होती. तिने २०२१ मध्ये अनिरबेद चटोपाध्याय दिग्दर्शित ‘भार: द क्लाऊन’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.

( Bengali Actress Bidisha De Majumdar Found Dead In Her Apartment At Kolkata )

अधिक वाचा

भयंकर! दहशतवाद्याकडून काश्मीरमध्ये अभिनेत्रीची गोळी घालून हत्या, सोबत १० वर्षांचा…

एकच चर्चा; ‘जेठालाल’ खऱ्या आयुष्यात जगतात कसे? दिलीप जोशींकडे पैसा किती? पाहा तुम्हीच

दिलीप जोशींची यशोगाथा I अवघ्या ५० रुपयांपासून सुरु केले करिअर, आज एका एपिसोडसाठी ‘जेठालाल’ घेतात बक्कळ पैसे

हे देखील वाचा