गेले काही दिवस बंगाली चित्रपटसृष्टीसाठी अतिशय धक्कादायक ठरले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत बंगाली चित्रपट जगतातील ४ अभिनेत्री/ मॉडेल्सने आत्महत्या केली आहे. या चित्रपटसृष्टीतील ताजे आत्महत्या प्रकरण म्हणजे, सरस्वती दास. जिने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कोणत्याही मनोरंजनविश्वासाठी ही अत्यंत आश्चर्यचकित करणारी घटना आहे. सततच्या आत्महत्या प्रकरणाने बंगाली चित्रपटसृष्टीची पाळेमुळे अक्षरश: हादरली आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला त्या ४ बंगाली अभिनेत्री, मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या १५ दिवसांत आपला जीव गमावला आहे. (bengali industry in shock after 4 suicide in 2 weeks)
पल्लवी डे (Pallavi Dey)
या यादीत पहिले नाव आले आहे, पल्लवी डे हिचे. जिने मे महिन्याच्या १५ तारखेला आत्महत्या केली होती. २५ वर्षीय पल्लवीचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर साग्निक चक्रवर्ती याच्यावर त्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, साग्निकचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे पल्लवी आणि साग्निकमध्ये सतत भांडणे होत होती. तसेच, नंतर पोलिसांनी साग्निकला अटक केली.
बिदिशा डे (Bidisha Dey)
पल्लवीनंतर, २५ मे रोजी बंगाली अभिनेत्री बिदिशा डे हिचा मृतदेह तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. बिदिशाच्या मृतदेहासोबत पोलिसांना तिच्या अपार्टमेंटमधून एक सुसाईड नोटही सापडली आहे. बिदिशा डेला तिच्या जिम ट्रेनर बॉयफ्रेंडसोबत त्रासात होती. रिपोर्ट्सनुसार, बिदिशा डेच्या जोडीदाराचे तिच्याशिवाय इतर मुलींसोबत अफेअर सुरू होते. जेव्हा अभिनेत्रीला ही माहिती समजली, तेव्हा ती अस्वस्थ झाली आणि बिघडत चाललेले नाते पाहता तिने आत्महत्या करणे योग्य मानले.
मंजुषा मजुमदार (Manjusha Majumdar)
बंगालची अभिनेत्री मंजुषा ही बिदिशा डेची जवळची मैत्रिण होती. असे सांगितले जात आहे की, आत्महत्येपूर्वी बिदिशा मंजुषाशी तिच्या आयुष्यातील समस्यांबद्दल बोलली होती. त्यानंतर मॉडेल आणि अभिनेत्री मंजुषा हिने २७ मे रोजी आत्महत्या केली. मैत्रिण बिदिशाच्या मृत्यूचा तिला जबरदस्त धक्का बसल्याचे सांगितले. मंजुषाने खूप कमी वयात बंगाल फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र तिच्या आत्महत्येचे मुख्य कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.
सरस्वती दास (Saraswati Das)
या यादीत १८ वर्षीय सरस्वती दासचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. शनिवारी, ३० मे रोजी या मॉडेलने आत्महत्या करून आपला जीव गमावला. सरस्वतीचा मृतदेह बेडियाडंगा येथील तिच्या राहत्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. १२वी सोडून मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केलेल्या सरस्वती दासच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना कळलं की, तिचं आणि तिच्या प्रियकराचं भांडण झालं होतं. दुपारी एकच्या सुमारास कॉल रेकॉर्डिंगवरून हा प्रकार उघडकीस आला. मात्र, पोलीस अद्याप शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा