Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बेशरम रंग’ गाण्याची गायिका स्पष्टच म्हणाली, ‘कपड्यांपेक्षा जास्त…’

मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर ‘पठाण‘ चित्रपटाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोज नवीन काहीतर आरोप करत चित्रपटाला ट्रोल केलं जातंय मात्र, याचा काहिच फरक अभिनेत्याला पडत नाही असे त्याने स्पष्टच सांगितले आहे. ‘बेशरम रंग‘ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी घतल्यामुले हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे अनेक नेटकरी चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या गाण्यामुळे वाद पेटला आहे बेशरम रंग गाण्याची गायिका कैरालिसा मोंटेरो हिने देखिल मौन तोडले आहे आणि तिची प्रतिक्रिय सांगितली आहे.

बॉलिवूडमधील किंग खान म्हणून ओळखणारा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा सतत चर्चेत असणारा ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाचा वाद संपता संपेना. बेशरम रंग (Besharam Rang) गाणयामुळे पेटलेल्या वादावर आता गाण्याची गायिका कैरालिसा मोंटेरो  (Caralisa Monteiro) हिने ट्रोलर्सला चांगलेच सडेतोड अत्तर दिले आहे ज्यामुळे गायिका खूपच चर्चेत आली आहे.

कैरालिसा मोंटेरो हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे निर्माण होणेयाऱ्या वादावर स्पष्टच वक्तव्य करत सांगितले की, “मला आपल्या राष्ट्रध्वजाशी भगव्या रंगाचा संबंध माहित आहे, जो धैर्य आणि निस्वार्थीपणाचे प्रतीक मानला जातो. या गाण्यामुळे कोणते (मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा) नाराज झाला आहेत. हे मला माहीत नाही, पण मला खात्री आहे की, आपल्या देशात काल्पनिक चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगापेक्षा कितीतरी जास्त गंभीर प्रश्न आहेत, ज्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”

गायिका कैरालिसाने पुढे सांगितले की, “मध्य प्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Nrottam Mishra) यांनी ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट शेअर करत लिहिले होते की, ‘पठाण चित्रपटातील गाण्यात तुकडे-तुकडे टोळीची समर्थक अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पोशाख अत्यंत आक्षेपार्ह असून हे गाणे दूषित मानसिकतेने चित्रित करण्यात आलं आहे. गाण्याचे दृश्य आणि वेशभूषा निश्चित करावी, अन्यथा मध्य प्रदेशात चित्रपटाला परवानगी द्यायची की नाही, हा विचार करण्याचा विषय ठरेल.”

शाहरुख खान स्टारर ‘पटाण’ चित्रपट हिंदीच नाही, तर तमिळ आणि तेलुगू भाषेतही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्याने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि दीपिका शिवाय अभिनेता जॉन अब्राहम (Jon Abraham) देखिल पाहायला मिळणार आहे. पठाण चित्रपट (दि, 25 जानेवारी) रोजी चित्रपट गृहामध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भगव्या’ रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये सनी लिओनीने लावली पाण्याला आग, पाहाच व्हायरल व्हिडिओ

‘बेशरम रंग’ गाण्याची गायिका स्पष्टच म्हणाली, ‘कपड्यांपेक्षा जास्त…’

हे देखील वाचा