Tuesday, January 31, 2023

‘बेशरम रंग’च नाही, तर ‘या’ गाण्यांमुळेही झाला हाेता माेठा वाद, एकदा पाहाच यादी

शाहरुख खानच्या ‘पठाण‘ चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे प्रसिद्ध गाणे 4 दिवसांपूर्वी रिलीज झाले होते, ज्यावर 54 मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत. हे गाणे तरुणांमध्ये विशेष पसंत केले जात आहे. ते दीपिका पदुकोणच्या या गाण्यावर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत, पण काही लोक सोशल मीडियावर गाण्याबाबत नकारात्मकता पसरवत आहेत आणि वाद निर्माण करत आहेत.

‘पठाण’ चित्रपटावर लोकांचा एक गट बॉयकॉट करत आहे. दीपिका पदुकोणने भगव्या रंगाचा स्विमसूट परिधान करुन लाेकांच्या भावना दुखावल्याबद्दल काही लाेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, बाॅलिवूडमध्ये चित्रपट वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘बेशरम रंग’ सारखी अनेक प्रसिद्ध गाणी वादात सापडली आहेत.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ गाणे ‘राधा’
‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधील ‘राधा’ या गाण्याला अडचणींचा सामना करावा लागला हाेता. कारण, ज्यांच्यासाठी ‘राधा’ ही एक देवी आहे, त्यांच्यासाठी असे अपशब्द वापरणे अयाेग्य आहे. असे मानणाऱ्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे लाेकांचे म्हणणे हाेते. माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते करण जोहर आणि गौरी खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

मुन्नी बदनाम हुई
‘दबंग’मधील ‘मुन्नी बदनाम हुई’ गाणे अश्लील बोल आणि व्हिज्युअलमुळे अडचणीत आले हाेते. याशिवाय ‘झंडू बाम’ बनवणाऱ्या कंपनीने अरबाज खान प्रॉडक्शनला त्यांच्या ब्रँडचे नाव त्यांच्या संमतीशिवाय वापरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, हे गाणे मलायका अरोराच्या आवडत्या आयटम साँगपैकी एक मानले जाते.

भाग डीके बोस
‘दिल्ली बेली’ मधील या गाण्याने जितेन ठुकराल आणि सुमीर तगरा यांच्या गाण्याच्या कॉपीराइटचे उल्लंघन केले हाेते. त्याच्याकडे ‘बाेसडीके’ नावाची मूळ रचना होती. या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या आमिर खानने हे सारं समिकरणं साेडवले. (bollywood movie pathaan song besharam rang and radha from student of the year dabangg movie munni badnaam hui controversies see list)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शालिनसाेबतच्या अफेअरच्या चर्चानंतर अभिनेत्री टिनाचा खळबळजनक खुलासा

अरे व्वा! टीना आणि राहुल पुन्हा एकत्र, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

हे देखील वाचा