Thursday, September 28, 2023

‘भाबी जी घर पर है’मधील ‘अंगूरी भाभी’ने घेतला मालिकेतून ब्रेक? अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक कारण

‘भाबी जी घर पर है’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेल्या 7 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांना हसवत आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक आवडती मालिका आहे. टीआरपीच्या बाबतीतही, मालिकेचे रेटिंग चांगले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच मनोरंजन करतात. या मालिकेतील अंगूरी भाभी हिची अदा तर प्रेक्षकांना घायल करते. पण आता या मालिकेची मोठी बातमी समोर आली आहे. या मालिकेत अंगूरीची भूमिका करणारी शुभांगी अत्रे आता ब्रेक घेणार असल्याचे बोलले जात आहे.

‘भाबी जी घर पर है’ ( Bhabi Ji Ghar Par Hai)या मालिकेत ‘सही पकड़े हैं’ म्हणत अंगूरी भाभीने प्रेक्षकाच मनोरंजन करते. अंगूरी भाभीचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे जे खास करून ‘सही पकड़े हैं ‘ हा संवाद ऐकण्यासाठी मालिका पाहतात. पण आता अंगूरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रे  (Shubhangi Atre) बातमीनुसार या शोमध्ये यापुढे दिसणार नाहीत. कारण अभिनेत्रीने शोमधून ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. अंगूरी भाभी शोमध्ये दिसणार नाही त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले. शुभांगी अत्रे लवकरच या शोमधून ब्रेक घेणार आहे.

शुभांगी अत्रेने ब्रेक घेण्यामागचे कारण सांगितले आहे. शुभांगी अत्रेची मुलगी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत स्थायिक होणार आहे. शुभांगीही तिच्या मुलीसोबत काही दिवस तिथे जाणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीने सध्या शोमधून ब्रेक घेतला आहे. पण शुभांगीची रजा काही अटींवर मान्य झाली आहे, ब्रेक घेण्यापूर्वी शुभांगीने आगामी सर्व शॉट्स शूट केले आहेत.

काही दिवसांची सुट्टी दिली आहे व सुट्टी संपताच लवकरच तिला पुन्हा शोमध्ये परतावे लागणार आहे. ‘भाबी जी घर पर है’ हि मालिका 2015 मध्ये सुरू झाली होती. या मालिकेत सध्या रोहताश गौर, आसिफ शेख, शुभांगी अत्रे आणि विदिशा श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(television ‘Bhabhi Ji Ghar Par Hai’ fame actress Shubhangi Atre will take a break from the series)

हेही वाचा-
सैफच्या अमृतासोबत गुपचूप लग्नाबाबत आई शर्मिलाचा खुलासा; म्हणाली, ‘त्याने घाईघाईने…’

‘या’ बॉलिवूड जोडप्याला देशाबाहेर कुणीही ओळखत नाही! स्वत:च स्वत:चे सामान उचलून निघाले कलाकार, Video

हे देखील वाचा