Thursday, June 13, 2024

सैफच्या अमृतासोबत गुपचूप लग्नाबाबत आई शर्मिलाचा खुलासा; म्हणाली, ‘त्याने घाईघाईने…’

सैफ अली खान आणि अमृता सिंग हे 90च्या दशकातील असे लव्ह बर्ड्स होते, ज्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होती. दोघांनी डेटिंग केल्यानंतर काही दिवसातच गुपचूप लग्न केले होते. परंतु त्यांच्या लग्नाला कोणीही उपस्थित नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचे कुटुंब देखील उपस्थित नव्हते. सैफ अली खानची आई आणि दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी इतक्या वर्षांनंतर एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.

वृत्तांनुसार, शर्मिला टागोर (Sharmila Tagore) म्हणाल्या की, “दोघांनी लग्न केले. मी देखील लग्नाला उपस्थित नव्हते, कारण त्यावेळी मी मुंबईमध्ये होते. सैफने अमृताबरोबर लग्न करण्याचा निर्णय घाईघाईने घेतला होता. मात्र, शेवटी मुलगा आणि सून असल्याने आम्ही आशीर्वाद दिला आणि त्यांचा स्वीकार केला.” यादरम्यान त्यांनी असेही म्हटले होते की, लग्नामुळे सैफच्या करिअरवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, त्यांनी देखील स्वतः मन्सूर अली खान यांच्याशी लग्न केल्यानंतर ‘आराधना’सारखे हिट चित्रपट दिले होते.

सैफ अली खानने (Saif Ali Khan) 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंग (Amrita Singh) हिच्याबरोबर लग्न केले होते. मात्र, दोघांचे लग्न केवळ 13 वर्षेच टिकले. दोन मुलांचे पालक होऊनही त्यांच्यातील भांडणे वाढतच गेली आणि शेवटी त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होणे चांगले मानले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सैफने घटस्फोटासाठी अमृताला 5 कोटी रुपये दिले होते. सारा आणि इब्राहिम या दोन्ही मुलांचा ताबाही अमृताला मिळाला. घटस्फोटानंतर सैफने करीना कपूर (Kareena Kapoor) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं, पण अमृता सिंगल मदर म्हणून मुलांचं संगोपन करत आहे. एका मुलाखतीत तिने दुसरे लग्न न करण्यामागचे कारण सांगताना सांगितले होते की, तिला आपल्या मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करायचे आहे, त्यामुळे तिने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. (Sharmila Tagore reveals Saif Ali Khan and Amrita singh marriage secrets)

हेही वाचा-
‘या’ बॉलिवूड जोडप्याला देशाबाहेर कुणीही ओळखत नाही! स्वत:च स्वत:चे सामान उचलून निघाले कलाकार, Video
वयाने 39 वर्षे मोठ्या रजनीकांत यांची हिरोईन बनण्यावर तमन्नाचे विधान; म्हणाली, ‘मी तर 60व्या वयातही…’

हे देखील वाचा