Sunday, October 1, 2023

‘या’ बॉलिवूड जोडप्याला देशाबाहेर कुणीही ओळखत नाही! स्वत:च स्वत:चे सामान उचलून निघाले कलाकार, Video

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने 31 जुलै रोजी नुकताच तिचा 31वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूड अभिनेता आणि तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा फेब्रुवारी 2023 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर कियाराचा हा पहिला वाढदिवस होता. अशात वाढदिवसानिमित्त बॉलिवूडचे क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा सध्या इटलीमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहेत. कियाराने तिच्या वाढदिवशी समुद्रात डुबकी मारण्याचा व्हिडिओदेखील शेअर केला होता. आता या जोडप्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे जोडपे त्यांचे सामान स्वतः घेऊन जाताना दिसत आहेत.

स्वत:च उचलले सामान
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी (Sidharth Malhotra And Kiara Advani) यांचा हा व्हिडिओ एका ट्रॅव्हल ब्लॉगरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघेही त्यांचे मोठे सामान सोबत घेऊन जाताना दिसत आहेत. तेथील लोकांशी अगदी सामान्यपणाने वागत आहेत. व्हिडिओमध्ये कियाराने बॅकलेस व्हाईट गाऊन घातला आहे, तर सिद्धार्थ हलक्या पिवळ्या रंगाच्या शर्ट आणि ट्राऊझर्समध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अशात सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी खूप कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “सिड खूप सुंदर दिसत आहे.” तसेच, दुसर्‍याने एका युजरने लिहिले की, “तिकडे कोणीही त्या दोघांना भाव देत नाही, ते इथे असते तर सेल्फी सेल्फी करून पब्लिक त्यांच्या मागे मागे पळते.” आणखी एकाने असे लिहिले की, “बहुतेक तिकडच्या लोकांना माहिती नसेल हे सेलिब्रिटी आहेत.” याव्यतिरिक्त जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला.

जोडप्याच्या कामाविषयी थोडक्यात
कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर 29 जून रोजी रिलीज झालेला तिचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच, सिद्धार्थविषयी बोलायचे झाले, तर ‘शेरशाह’ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर सिद्धार्थ लवकरच ‘योद्धा’ या सिनेमात झळकणार आहे. (actor sidharth malhotra and kiara advani seen dragging luggage in italy see video)

हेही वाचा-
वयाने 39 वर्षे मोठ्या रजनीकांत यांची हिरोईन बनण्यावर तमन्नाचे विधान; म्हणाली, ‘मी तर 60व्या वयातही…’
‘शेतीच्या कामाला बैल, कष्टाच्या कामाला गाढव आणि विकासाच्या कामाला *** लागतो’, सयाजी शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा