अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) ही ‘भाबी जी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain) या कॉमेडी मालिकेद्वारे घराघरात ओळखीचा चेहरा बनली आहे. यात ती ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येते. शुभांगी हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव असून ‘भाबी जी घर पर हैं’ या कॉमेडी शोपूर्वी ती ‘कस्तुरी’ या मालिकेत कस्तुरी चावलाच्या भूमिकेत दिसली होती. त्याचवेळी शुभांगीने २०१३ मध्ये टीव्ही मालिका ‘चिडिया घर’मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या (Shilpa Shinde) जागी एन्ट्री घेतली होती. योगायोगाने २०१६ मध्ये पुन्हा एकदा ‘भाबी जी घर पर हैं’मध्ये शिल्पाची जागा शुभांगीने घेतली होती.
शिल्पा शिंदेने ‘अंगूरी भाभी’ या व्यक्तिरेखेत अक्षरशः जीव ओतला होता आणि या व्यक्तिरेखेतून ती चांगलीच लोकप्रियही झाली होती. मात्र, निर्मात्यांशी मतभेद झाल्यानंतर शिल्पाने शो सोडला. त्यानंतर या शोमध्ये शुभांगी अत्रेची एन्ट्री झाली. मात्र, शुभांगी शिल्पाला कधीच भेटली नाही, पण तिच्या आणि शिल्पामध्ये कोणतेही वैर नाही. शुभांगीचा असा विश्वास आहे की, शिल्पाने अंगूरी भाभीचे पात्र जिवंत केले आहे. त्याच वेळी, ती असेही म्हणते की, तिने ‘अंगूरी भाभी’च्या व्यक्तिरेखेमध्ये तिचे इनपुट टाकताना खूप मेहनत घेतली आहे. (bhabiji ghar par hain angoori bhabhi shubhangi atre have no problems in doing intimate)
काही काळापूर्वी शुभांगीची एक मुलाखतही व्हायरल झाली होती. ज्यामध्ये तिला विचारण्यात आले की, ती इंटीमेट सीनसाठी तयार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात शुभांगीने सांगितले की, जर ते योग्य प्रकारे शूट केले जात असेल, तिला इंटिमेट सीन करण्यात कोणतीही अडचण नाही. शुभांगी म्हणते की, हे सीन पाहून तिच्या मुलीला लाज वाटू नये आणि आई काय करतेय असा प्रश्नही तिच्या मनात येऊ नये?
हेही वाचा-