Saturday, September 7, 2024
Home कॅलेंडर पहिल्या भेटीतच धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या होत्या हेमा, पण ‘या’ कारणामुळे धुडकावला त्यांनी अभिनेत्याचा प्रस्ताव

पहिल्या भेटीतच धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या होत्या हेमा, पण ‘या’ कारणामुळे धुडकावला त्यांनी अभिनेत्याचा प्रस्ताव

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. ऍक्शन हिरोपासून ते लव्हर बॉयपर्यंत सर्वच व्यक्तिरेखा या अभिनेत्याने उत्तमरीत्या साकारल्या आहेत. अभिनेत्याला हीमॅन म्हटले जाते. धर्मेंद्र बुधवारी (८ डिसेंबर) आपला ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. तर आज वाढदिवसाच्या खास निमित्त जाणून घेऊया, त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी…

धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ मधून करिअरला सुरुवात केली. १९६० ते १९७० या काळात त्यांनी अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर धर्मेंद्र यांचा दबदबा आहे. धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंग देओल असे आहे. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी नाव बदलले. (dharmendra birthday special know unknown and amazing love story with hema malini)

विवाहित असल्यामुळे हेमाने नाकारले होते नाते
धर्मेंद्र यांनी वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले होते. त्यांना सनी (Sunny Deol) आणि बॉबी (Bobby Deol) अशी दोन मुले आहेत. चित्रपटांमध्ये काम करत असताना त्यांची भेट हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याशी झाली. १९७० मध्ये धर्मेंद्र यांचे हृदय हेमा मालिनी यांच्यासाठी धडधडू लागले. पण त्यांचे लग्न झाले होते, त्यामुळे हेमा मालिनी यांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. धर्मेंद्र त्यांच्या काळात इतके हुशार आणि देखणे होते की, केवळ सामान्य मुलीच नाही तर अभिनेत्रींचेही मन हरवत होते. जया बच्चन (Jaya Bachchan) तर त्यांना ग्रीक देव मानतात.

धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, त्यांनी धर्म बदलून त्यांच्याशी लग्न केले. खरं तर त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला. ते मुस्लिम झाले, नाव दिलावर खानला ठेवले आणि गुपचूप लग्न केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा १९७९ मध्ये विवाह झाला.

एका मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, “मी आणि धर्मेंद्र अजूनही एकमेकांची काळजी घेतो. ज्या दिवशी मी धरमजींना पाहिले, मला कळले की ते माझ्यासाठीच बनलेले आहेत. मला माझे उर्वरित आयुष्य त्यांच्यासोबत घालवायचे आहे.” पुढे हेमाने सांगितले की, “धर्मेंद्र विवाहित आहे हे मला माहीत होते, परंतु पहिल्या भेटीतच मी त्यांच्या प्रेमात पडले होते. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांनी वेगळे व्हावे अशी माझी कधीच इच्छा नव्हती. मी धर्मेंद्रशी लग्न केले. पण माझ्या लग्नामुळे कोणाला त्रास होऊ नये अशी माझी इच्छा होती.” लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही हे जोडपे सुखाने संसार करत आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा