Thursday, May 23, 2024

आई अमृता सिंगला आवडत नाही सारा अली खानसोबत काम करायला, कारण ऐकून तर व्हाल चकित

अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) 2018 मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही, परंतु सारा अली खानचे या चित्रपटातील काम प्रेक्षकांना आवडले. साराने तिच्या पहिल्याच चित्रपटातून चित्रपट जगतात वेगळे स्थान निर्माण केले. आता ती लवकरच आनंद एल राय (Anand L Roy) यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुषसोबत (Dhanush) मुख्य भूमिकेत आहे. नुकताच सारा अली खानने तिची आई अमृता सिंगबद्दल (Amrita Singh) मोठा खुलासा केला आहे.

सारासोबत काम करायला नाही आवडत
सारा अली खानची आई अमृता सिंग एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता मात्र ती चित्रपटांमध्ये क्वचितच दिसते. साराने अनेकदा सांगितले आहे की, ती तिच्या आईला आपली प्रेरणा मानते. परंतु अलीकडेच तिने तिची आई अमृताबाबत असा खुलासा केला आहे, जो ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. साराने मीडियाशी खास संभाषणात सांगितले की, तिच्या आईला तिच्यासोबत काम करणे आवडत नाही. (sara ali khan revealed my mother amrita singh doesnt like work with me)

‘हे’ आहे कारण
खरं तर, जेव्हा साराला विचारले गेले की, ती तिची आई अमृता सिंगसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर करताना कधी दिसणार आहे. तेव्हा साराने उत्तर दिले की, तिच्या आईला तिच्यासोबत काम करायला आवडत नाही. याचे कारण सांगताना सारा म्हणते की, “मला वाटते की, ती माझी आई आहे त्यामुळे तिला माझ्यासोबत कधीच काम करायचे नाही.”

सारा अली खान पुढे म्हणाली, “शॉटमध्ये माझ्या चेहऱ्यावर केस आले, तर ती शूटिंग मध्येच थांबवेल आणि माझे केस सुधारेल. मी तिची मुलगी आहे त्यामुळे मी नेहमीच सर्वोत्तम दिसावे अशी तिची इच्छा आहे. मला वाटत नाही की मी तिला अशा परिस्थितीत कधीच टाकू इच्छितो.”

सोशल मीडियावर असतो वावर
सारा तिच्या चित्रपटांसह सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांना तिची ग्लॅमरस स्टाइलच नाही, तर तिचा साधेपणाही आवडतो. चित्रपटांमध्ये मनोरंजनासोबतच ती सोशल मीडियावरही तिच्या जोक्स आणि स्टाइलने चाहत्यांची मने जिंकते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बींना बेल बाॅटम घालने पडले महागात, एक उंदीर त्यांच्या पॅटंमध्ये घुसला अन्…

नवाजुद्दीनच्या पत्नीवर त्याच्याच वकिलाने लावले गंभीर आरोप, वाच काय आहे संपुर्ण प्रकरण

हे देखील वाचा