मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम करून एक अभिनेते खूप नावारूपाला आले. अभिनय करता करता दिग्दर्शक, निर्माते अशा विविध भूमिका निभावून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक वेगळेच स्थान निर्माण केले. ज्यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटाने तर लहानांपासून ते अगदी मोठ्यांंपर्यंत सगळ्यांचे मनोरंजन केले होते. ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील धडाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे होय. मंगळवारी (२८ सप्टेंबर) ते त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांना अनेक कलाकार वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच भरत जाधवने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भरत जाधवने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘पछाडलेला’ या चित्रपटातील महेश कोठारे यांच्या सोबतच्या एक सीनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटातील हॉटेलमधील सीन चालू असतो. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “आदरणीय महेश कोठारे सर, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ‘पछाडलेला’ सारखा अफलातून चित्रपट तुम्ही मला दिलात. खरं तर तो चित्रपट नाटकाच्या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळे मी नाकारला होता, पण लक्ष्या मामाच्या शब्दाखातर आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी थांबलात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” (Bharat Jadhav give birthday wishesh to mahesh kothare with sharing a photo on social media)
त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर त्यांचे अनेक चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेकजण ‘पछाडलेला २’ हा चित्रपट यावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी मराठीमध्ये ‘प्रीत तुझी माझी’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘लेक चालली सासरला’, ‘धूम धडाका’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘जीवलगा’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘धांगड धिंगा’, ‘पछाडलेला’, ‘खबरदार’, ‘शुभमंगल सावधान’, ‘फुल ३ धमाल’, ‘आयडियाची कल्पना’, ‘दुभंग’, ‘झपाटलेला २’ यांसारख्या चित्रपटात काम आणि दिग्दर्शन देखील केले आहे. तसेच त्यांनी ‘घर घर की कहानी’, ‘सफर’, ‘छोटा जवान’ या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. ‘धूमधडाका’ या मराठी चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आहे होते. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-