प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) सध्या मातृत्वाचा आनंद लुटताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे, ज्याची माहिती तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर १२ दिवसांतच भारती कामावर परत आली होती, ज्यामुळे तिचे अनेकांनी कौतुक केले होते. मात्र या सगळ्यांपेक्षा भारतीने आत्तापर्यंत तिच्या मुलाचे तोंड दाखवले नाही, याची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. आता भारतीने या बाबतचे कारण स्पष्ट केले आहे.
सध्या भारती सिंग तिच्या घरी आलेल्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. आपल्या चिमुकल्या मुलाचे तिने गोला असे नावही ठेवले आहे. मात्र तिच्या चाहत्यांना आत्तापर्यंत तिने मुलाचे तोंड दाखवले नाही, त्यामुळे तिच्या चाहत्यांनी नाराजीही दर्शवली होती. आता भारतीने पहिल्यांदाच या बाबतचा खुलासा केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती आपल्या मुलाला आपल्या मांडीवर धरून बसलेली दिसत आहे. मात्र, मुलाचा चेहरा मात्र दिसणार नाही याची काळजी ती घेताना दिसत आहे.
याबाबतचे स्पष्टीकरण देताना ती व्हिडिओमध्ये, “मी वचन देते की मी तुम्हाला लवकरच चेहरा दाखवेन. आता ४०-५० दिवस मुलाचे तोंड दाखवू नका, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी दाखवू शकत नाही. नाहीतर माझ्या मनावर असते, तर मी कधीच दाखवले असते” असे म्हणताना दिसत आहे. तसेच, “गोला तुम्हाला हाय म्हणायला खूप उत्सुक आहे. लवकरच भेटू. मी नक्की एक व्हिडीओ बनवीन ज्यात मी गोलाचे म्हणजे मुलाचे तोंड दाखवेन.” असा शब्दही भारतीने दिला आहे. यापूर्वी भारतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती आपल्या मुलाला मिठी मारताना दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- ‘केजीएफ’च्या यशााचे धमाकेदार सेलिब्रेशन, अभिनेत्याने केक कापत कॅप्शन मधून दिला ‘हा’ इशारा
- सिद्धार्थ शुक्लाचा जुना व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी ‘परत ये,’ म्हणत दिल्या भावूक प्रतिक्रिया
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ने सन्मानित, म्हणाले- ‘दीदी वयाने आणि कर्माने मोठ्या होत्या.’