×

सिद्धार्थ शुक्लाचा जुना व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी ‘परत ये,’ म्हणत दिल्या भावूक प्रतिक्रिया

प्रसिद्ध टिव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shhukla)  आज आपल्यात नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याची जागा आजही तशीच आहे. एक प्रतिभावान कलाकार म्हणून सिद्धार्थ शुक्लाची ओळख होती. त्यामुळेच त्याच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. बिग बॉस १२ पासून सिद्धार्थ शुक्ला प्रकाशझोतात आला. यशाच्या शिखरावर असतानाच त्याच्या मृत्यूने प्रत्येकालाच धक्का बसला होता. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर त्याच्या चाहत्यांनी भावूक प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. कोणता आहे तो चला जाणून घेऊ. 

हा व्हिडिओ प्रसिद्ध पापाराझी ‘व्हायरल भयानी’ने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ त्याच्या कारमध्ये बसून नारळ पाणी पिताना दिसत आहे, तेव्हा पापाराझी येऊन त्याला घेरतात. पापाराझीला पाहून सिद्धार्थ “काय करतोस यार, कुठेही कॅमेरा घेऊन येतोस कधीतरी घरी पण राहत जा.” असे म्हणत कॅमेरामनची गंमत करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावर कॅमेरामॅनही “आम्ही तु दिसला की येतो कारण तु खूप कमी वेळा दिसतोस” असे उत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करताना पापाराझींनी “आम्ही तुमचे ऐकले आणि तुम्हाला फॉलो करणे थांबवले, कारण तुम्हाला ते आवडला नाही, परंतु आम्हाला तुमच्या आठवणी जिवंत ठेवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”. असा सुंदर कॅप्शन दिला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ खूपच मस्त दिसत आहे. आपल्या आवडत्या स्टारला हसताना पाहून चाहते खूप भावूक होत आहेत.

सिद्धार्थच्या या  व्हायरल व्हिडिओवर भावूक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर एका युजरने ‘सिद्धार्थ परत ये’ अशी भावूक साद घालणारी प्रतिक्रिया दिली आहे तर आणखी एकाने सिद्धार्थला हसताना पाहून खूप आनंद झाल्याचे म्हणले आहे. त्याचप्रमाणे आणखी अनेकांनी “तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.  वयाच्या 40 व्या वर्षी त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

 

Latest Post