×

‘केजीएफ’च्या यशााचे धमाकेदार सेलिब्रेशन, अभिनेत्याने केक कापत कॅप्शन मधून दिला ‘हा’ इशारा

सध्या सिनेजगतात ‘केजीएफ २’ चित्रपटाचीच सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. प्रदर्शनााच्या पहिल्या दिवशीपासूनच या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड केले आहेत. सुपरस्टार यशचा दमदार अभिनय आणि चित्रपटाची कथा यांमुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा अभुतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळत आहेत. या घवघवीत यशाने चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि अभिनेता यशचे (Yash)  सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल  होताना दिसत आहेत ज्यामध्ये ते केजीएफच्या सक्सेसचा केक कापून   आनंद साजरा करताना दिसत आहेत. 

कन्नड स्टारर यशचा चित्रपट ‘केजीएफ 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने एकट्या भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा व्यवसाय केला आहे, तर त्याचे जगभरातील कलेक्शन 700 कोटींच्या पुढे गेले आहे. लवकरच हा चित्रपट 1000 कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 14 एप्रिल 2022 रोजी कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर त्याची रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच आहे. चित्रपटाच्या ऐतिहासिक यशाने आनंदी, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माता आणि होमेबल पिक्चर्सचे संस्थापक विजय किरगंदूर यशसोबत सेलिब्रेशन करत आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करताना तिघांचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये विजय आणि प्रशांत यशच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहेत आणि तिघांच्या समोर एक केक देखील ठेवला आहे ज्यावर केजीएफ लिहिले आहे.

Homeable Pictures च्या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो पोस्ट करताना ”ही फक्त सुरुवात आहे” असा कॅप्शन दिला आहे. केजीएफ प्रमाणे केजीएफ 2 च्या धमाकेदार यशानंतर आता केजीएफ 3 ची तयारी सुरू झाली आहे. केजीएफ 2 मध्ये देखील त्याच्या तिसऱ्या भागाची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. यश चित्रपटाच्या यशाने खूप खूश असून अलीकडेच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. केजीएफपूर्वी यशने कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु या चित्रपटाने त्याचे नशीब चमकले आणि तो रातोरात स्टार बनला.

Latest Post