Thursday, July 18, 2024

आपल्या सासऱ्यांबद्दल कॉमेडियन भारती सिंगचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘आता तर सासरेही…’

प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपे म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र काम करताना दिसतात. दोघांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. भारती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. अलीकडेच भारतीने वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना आपल्या सासरच्या मंडळींबद्दल अनेक खुलासे केले.

भारती सिंग (Bharti Singh) ही चित्रपटक्षेत्राील सगळ्यात यशस्वी कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध आहे. कॉमेडी शो सोबतच ती अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही करताना दिसून येते. २०१७ मध्ये तिने लेखक हर्ष लिंबाचियासोबत (Harsha Limbachiya) लग्न केले होते. गोव्यामध्ये झालेल्या या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा त्यावेळी रंगली होती.

सासरच्यांविषयी खुलासा
सध्या भारती आपल्या पहिल्या बाळाच्या तयारीत व्यस्त असून ते लवकरच आई- बाबा होणार आहेत. भारती एका पंजाबी परिवारात वाढली असून तिचा पती गुजराती आहे. दोघांचे कुटुंब वेगळे असूनही भारती सिंग त्या कुटुंबात कशी मिसळून गेली याचा खुलासा तिने कार्यक्रमात बोलताना केला आहे. मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जुळ्या बहिणी अशी ओळख असलेल्या सुरभी आणि समृद्धी म्हणजेच चिंकी- मिंकीने भारती सिंग सोबतचा हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्राम आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

या मजेशीर व्हिडिओमध्ये चिंकी आणि मिंकी भारतीला अनेक प्रश्न विचारताना दिसून येतात. ‘यापूर्वी तुझी कधी दोन लोकांनी मुलाखत घेतली आहे का?’ असा प्रश्न भारतीला विचारला जातो. त्यावर उत्तर देत भारती म्हणते की, “माझ्या सासू सासऱ्यांनी माझी मुलाखत घेतलीय.” त्यानंतर एका पंजाबी परिवारात वाढलेल्या असूनही गुजराती परिवारात कशी मिसळून गेलीस असा प्नश्न तिला विचारला जातो. भारतीने याचाही खुलासा केला आहे. या मजेशीर मुलाखतीत भारतीला अनेक प्रश्न विचारले गेले.

सासरेसुद्धा सोबत बसतात प्यायला
यावेळी ड्रिकिंग स्टेट आणि ड्राय स्टेट यामुळे काही वाद होतो का? असा प्रश्न विचारला असता ती म्हणते की, “आता तो प्रदेशसुद्धा ड्रिंकिंग प्रदेश झाला आहे. इतकेच नाही, तर सासरेसुद्धा सोबत प्यायला बसतात,” असाही खुलासा तिने यावेळी केला.

दरम्यान गरोदर असूनही भारती सिंग काम करताना दिसत आहे. सध्या ती आणि हर्ष ‘हुनरबाज’ कार्यक्रमाच सूत्रसंचालन करताना दिसत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा