Saturday, April 20, 2024

भारती सिंगचा ‘गोला’ झाला एक महिन्याचा, फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

कॉमेडियन भारती सिंग (Bharati Singh) आजकाल तिच्या कामासोबतच आई बनण्याचा आनंदही घेत आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया 3 एप्रिल 2022 रोजी पालक झाले होते. भारती सिंगने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता भारतीच्या बाळाला एक महिना पूर्ण झाला आहे.मात्र भारतीने अद्याप तिच्या मुलाचा चेहरा दाखवला नव्हता आणि चाहते बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच भारतीने तिच्या मुलाचा एक महिन्याचा वाढदिवस साजरा केला. ज्यावेळी तिने मुलाचा फोटो पहिल्यांदाच दाखवला आहे.

3 मे रोजी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा लाडका मुलगा 1 महिन्याचा झाला आणि या खास प्रसंगी कॉमेडियनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या मुलाचे काही फोटो शेअर केले आहेत. एका महिन्याच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या या फोटोमध्ये त्यांचा मुलगा गोला हा पापा हर्ष लिंबाचियाच्या मांडीवर दिसत आहे. या फोटोत वडील आणि मुलगा दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

त्याचप्रमाणे दुसऱ्या फोटोमध्ये भारती सिंग आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. भारतीने हे फोटो शेअर करत “एका महिन्याच्या शुभेच्छा” असा कॅप्शन दिला आहे. भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने मुलाचे नाव अधिकृतपणे ठेवलेले नाही, फक्त ते त्याला प्रेमाने गोला म्हणतात. भारती सिंगच्या मुलाला पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी भारतीला तिच्या मुलाचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विचारला आहे. भारतीनेही  तिच्या चाहत्यांना  ती लवकरच तिच्या मुलाचा एक गोंडस फोटो शेअर करेल. असा शब्द दिला आहे. सध्या भारतीच्या या व्हायरल पोस्टची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा