Friday, July 12, 2024

भारती सिंगचा डिलिव्हरीचा व्हिडिओ आला समोर, लेबर पेनमध्ये कॉमेडीयनची हालत झाली खराब

प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग आई झाली. भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारतीचा नवरा असलेल्या हर्ष लिंबाचियाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत भारतीने मुलाला जन्म दिल्याचे सांगितले होते. आता भारतीचा डिलिव्हरी आधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारती हॉस्पिटलमध्ये जात असल्यापासून ते तिच्या लेबर पेनपर्यंत सर्वच दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ स्वतः भारतीने आणि हर्षने शूट केला असून आता त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे.

लाईफ ऑफ लिंबाचिया यूट्यूब चॅनेलवर आपला व्हिडिओ शेअर करत या कपलने व्हिडिओच्या टायटलमध्ये लिहिले, “इट्स अ बॉय, गुड न्यूज़ आउट…” या ब्लॉगची सुरुवात होते ती भारती सिंगच्या आवाजाने ती म्हणते, “फायनली आम्ही बेबी घ्यायला जात आहोत.” तर या व्हिडिओमध्ये भारतीला जिथे एका बाळाला जन्म देणेच अवघड झाले तर तिथे हर्ष ६ मुलाची डिमांड करताना दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये जात असताना गाडीत भरतीच्या चेहऱ्यावरची भीती, उत्साह, रडू सर्वच स्पष्ट दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर हर्ष आणि भारती त्यांच्या रूमची सफर देखील घडवतात.

या दरम्यान भारती नर्ससोबत बोलताना आणि तिला अनेक प्रश्न विचारताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर असलेला नर्वसनेस देखील दिसत असून, त्या दोघांनी या खास दिवसातील एक एक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओच्या शेवटी दोघे त्यांच्या फॅन्सला आनंदाची बातमी देताना त्यांच्या छोट्या राजकुमाराने जन्म घेतल्याचे सांगतात. या प्रेग्नन्सी दरम्यान भारती तिच्या कामातही सक्रिय दिसली. डिलिव्हरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती शूटिंग करत होती. प्रत्येक दिवशी मीडियाचे कॅमेरे तिला सेटवर स्पॉट करत होते. भारतीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून, त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स येत लोकं त्यांना शुभेच्छा देत आहे. भारतीला सुरुवातीपासूनच एका छोट्या परीची हौस होती. मात्र तिला मुलगा झाल्याने तिची ही इच्छा अपूर्ण राहिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा