Sunday, June 4, 2023

मुलगा गोलाच्या पहिल्या ट्रिपमध्ये भारती सिंगसोबत घडला ‘हा’ प्रकार, सर्वांसमोर व्हावे लागले लाजिरवाणे

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) तिच्या परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. ती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया ३ एप्रिल २०२२ रोजी पालक झाले. भारतीने एका मुलाला जन्म दिला, ज्याला ती प्रेमाने ‘गोला’ म्हणते. दरम्यान भारती आणि हर्ष आपल्या बाळासाठी वेळ काढत आहेत आणि पहिल्या सुट्टीसाठी गोव्याला गेले आहेत. मात्र तिथे असे काहीतरी घडले, ज्यामुळे भारतीला लाजीरवाणे व्हावे लागले.

भारती सिंगने अलीकडेच तिच्या यूट्यूब चॅनल ‘LOL (Life of Limbachiyaa)’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तिचा मुलगा गोलाच्या पहिल्या व्हॅकेशनचा आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला भारती सांगते की, तिच्या मुलाची ही पहिलीच फ्लाइट आहे. भारती सांगते की, ती आणि हर्ष त्यांचा मुलगा गोलासोबत ज्या ठिकाणी त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग झाले होते, म्हणजे गोव्यात आले आहेत. इतकंच नाही, तर ज्या हॉटेलमध्ये तिचं लग्न झालं होतं त्याच हॉटेलमध्ये ती कुटुंबासोबत राहात असल्याचं भारती सांगते. (bharti singh share her son golla first trip video)

मात्र, व्हिडिओमध्ये एक ट्विस्ट आहे, ज्यामध्ये भारती नाराज दिसत आहे. खरं तर तिची आया आणि हाउसहेल्पर या दोघीही भारतीसोबत गोव्याला गेल्या आहेत. जेव्हा कॉमेडियन या सहलीशी संबंधित प्रत्येक क्षण टिपत होती, तेव्हा त्यांची आया आणि हाउसहेल्पर भांडू लागतात. दरम्यान ती दोघांनाही शांत करते, पण रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर भारतीचा मूड बिघडतो.

त्यांची आया आणि हाउसहेल्पर रेस्टॉरंटमध्येही एकमेकांशी भांडू लागल्या, त्यामुळे भारती आणि हर्ष लाजिरवाणे व्हावे लागले आणि ते जेवण अर्धवट सोडून हॉटेलमध्ये आले. मात्र, या सगळ्यानंतरही हॉटेलबाहेर दोघी पुन्हा भांडू लागल्या आणि त्यानंतर भारती त्यांना शांत करण्यात व्यस्त झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा