सध्या सर्वत्र एका आणि एकाच सिनेमाची चर्चा आहे आणि तो म्हणजे ‘पुष्पा’. अल्लू अर्जुनच्या या सिनेमाने फक्त साऊथ इंडियामध्येच नाही तर संपूर्ण देशात पर्यायाने जगात या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तर या सिनेमाच्या गाण्यांनी, संवादांनी, डान्सने अमाप लोकप्रियता मिळवली आहे. जिकडे तिकडे फक्त याच सिनेमाची चर्चा आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन बराच काळ झाला असला तरी या सिनेमाची क्रेझ किंचितही कमी झालेली नाही. या सिनेमातील मुख्य लक्षवेधी ठरत असलेला किंवा ठरलेली एक गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुनाचा लूक आणि त्याची स्टाईल. या दोन्ही गोष्टी अनेक लोकं कॉपी करताना दिसत आहे. या लूकची आणि त्याच्या स्टाईलची भुरळ मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी देखील पडली आहे. यातल्याच एका कलाकाराने तर त्याच्या लुकसोबत त्याची स्टाईलही कॉपी केली आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ शोमधील सर्वांचा लाडका आणि तुफान प्रसिद्ध असलेल्या भाऊ कदमला देखील या सिनेमाची आणि अल्लू अर्जुनच्या स्टाईलची चांगलीच भुरळ पडली आहे. त्याने त्याच्या ‘चला हवा येऊ द्या’ शोच्या आगामी स्किटमध्ये अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमातील ‘पुष्पाराज’ या भूमिकेचा लूक घेतला असून, या लूकचा आणि स्टाईलचा फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “लवकरच …!” पुष्पा….!” याचाच अर्थ प्रेक्षकांना आता ‘चला हवा येऊ द्या’च्या आगामी भागात पुष्पा सिनेमातील स्किट पाहायला मिळणार आहे.
भाऊ कदमने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने अल्लू अर्जुनाचा लूक कॉपी करत पांढरा शर्ट, पांढरी पँट, पांढरे शूज, डोळ्यांवर गॉगल, कपाळावर टीका, हातात घड्याळ, कॅरी केले असून, त्याने अर्जुन सारखीच दाढी आणि हेयर स्टाईल ठेवली आहे. त्याची बसण्याची पद्धत देखील हुबेहूब अल्लू अर्जुन सारखी असून, तो ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर बसलेला दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याच्या लूकचे कौतुक केले आहे. तेजस्विनी पंडिताने लिहिले आहे की, “काय खार नाही आता” तर अभिज्ञा भावेने लिहिले, “भाऊ”. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत २० हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.
हेही वाचा :