×

तेजस्वीने शमिता शेट्टीला आंटी म्हटल्याने भडकली बिपाशा बासू, म्हणाली ‘असे लोक कोणासाठी विजेते किंवा आदर्श असतील…’

टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्तपैकी असलेला बिग बॉस सतत चर्चेत असतो. ज्याच्या प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांना मारामारी आणि गोंधळ पाहायला मिळतो. असेच काहीसे बिग बॉसच्या १५ व्या सीझनमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. खरंतर शोचा हा सीझन आता शेवटच्या अगदी जवळ पोहोचला आहे. शोचा फिनाले ३ दिवसांनी होणार आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, बिग बॉसने दिलेल्या सीझनच्या शेवटच्या टास्कमध्ये पुन्हा एकदा शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांशी भांडताना दिसले. टास्क दरम्यान तेजस्वी शमिताला आंटी म्हणाली आणि तिला बळजबरीने ओढणे हे शमिताला आवडले नाही, त्यानंतर दोघींमध्ये जोरदार वाद झाला.

त्याचवेळी हा शो पाहणारे सर्व प्रेक्षक तेजस्वीला तिच्या वागणुकीसाठी फटकारतानाही दिसले. तर सर्वजण शमिताचे समर्थन करताना दिसले. शमिता आणि तेजस्वी यांच्यातील भांडणानंतर शमिता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूनेही तेजस्वीच्या या कृत्याबद्दल तिला फटकारत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शमिताला आंटी म्हटल्याबद्दल नाराजी व्यक्त करत बिपाशाने ट्विटरवर आपली भूमिका मांडली. तेजस्वीला फटकारताना तिने लिहिले की, “एखाद्याला वयाबद्दल बोलून सॉरी म्हणणे खरोखरच दयनीय आहे. असे लोक कोणासाठी विजेते किंवा आदर्श असतील, तर ते खरोखरच दुःखद आहे.” ती पुढे म्हणाली की, “जर तुला असुरक्षित वाटत असेल, तर इतर मुलींना खाली खेचण्याऐवजी तू त्या व्यक्तीला विचार, कारण तेच तुला असुरक्षित वाटून देत आहेत.” याशिवाय शमिताचे चाहतेही तिला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा देत आहेत. तर तेजस्वीच्या या कृत्यासाठी तिची जोरदार शाळाही घेतली जात आहे. यादरम्यान अनेकांनी तेजस्वीला फेक म्हटले, तर अनेकांनी करणला असुरक्षित म्हणत प्रश्न विचारला.

Bigg Boss 15: 5 times Shamita Shetty and Tejasswi Prakash proved they are  fearless | PINKVILLA

 

सीझनच्या शेवटच्या टास्क दरम्यान, पब्लिकला बिग बॉसच्या घरात बोलावण्यात आले होते. घरात आलेले लोक सदस्यांना वेगवेगळी कामे करून देत होते. दरम्यान, शमिता जनतेने दिलेल्या टास्क अंतर्गत करण कुंद्राला मसाज करत होती. पण शमिताला करणच्या इतक्या जवळ पाहून तेजस्वीला थांबता आले नाही आणि तिने शमिताला खाली खेचले. इतकंच नाही, तर यावेळी तिने शमिताला आंटी म्हणून हाक मारली.

इतकंच नाही, तर यादरम्यान ती राकेश बापट नसून करण कुंद्रा असल्याचंही म्हणाली. तेजस्वीच्या तोंडून हे ऐकून शमिता चांगलीच संतापली. यादरम्यान तेजस्वीने असेही सांगितले की, प्रेक्षक सर्वकाही पाहत आहेत, त्यामुळे किमान प्रेक्षकांचा आदर करा. मात्र, प्रेक्षक गेल्यानंतर शमिताने आपला राग तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यावर काढला. एवढेच नाही, तर शेवटी ती रडतानाही दिसली.

हेही वाचा :

Latest Post