×

‘माझ्या ब्राची साईज…’, अभिनेत्री श्वेता तिवारीची घसरली जीभ, कार्यक्रमातच केले वादग्रस्त विधान

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्यासाठी आणि तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. त्यासह ती सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. नुकतीच श्वेताने एका कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्याचवेळी तिच्या तोंडून एक वादग्रस्त विधान निघाले. यानंतर आता ही अभिनेत्री वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्वेता लवकरच एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेची घोषणा करण्यासाठी श्वेता तिवारी स्वतः भोपाळला गेली होती. कार्यक्रमात जेव्हा अभिनेत्री बाकी लोकांसोबत स्टेजवर बसली होती.

त्याचवेळी श्वेताच्या (Shweta Tiwari) तोंडून हे वादग्रस्त विधान बाहेर पडले. त्यावेळी ती म्हणाली की, “माझ्या ब्राची साईज…” त्यावेळी वेबसीरिजचे संपूर्ण कलाकार श्वेतासोबत स्टेजवर बसले होते. स्टेजवर एखाद्या गोष्टीवर हलकेफुलके विनोद सुरू असतानाच श्वेतासोबत ही घटना घडली.

View this post on Instagram

A post shared by My Bhopal (@mybhopalofficial)

श्वेताच्या ‘या’ वक्तव्यावर युजर्सने दिल्या प्रतिक्रिया

श्वेताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. व्हिडिओ पाहून काही युजर्स असे म्हणताना दिसत आहेत की, “श्वेता काय बोलत आहे हे तिला कळत नाही,” तर दुसरा युजर म्हणाला की, “बेशरमची देखील सीमा असते.”

श्वेता तिवारीने चाहत्यांना सांगितले होते की, ती लवकरच एका नवीन प्रोजेक्टशी जोडली जाणार आहे. या संदर्भात तिने एक इंस्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली आहे. अभिनेत्रीने शूटिंगपूर्वी तिच्या मेकअप सेशनची झलक दाखवली. अभिनेत्रीने विकास कलंत्रीची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्वेताला तिच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यापूर्वी श्वेता ‘खतरों के खिलाडी’च्या ११ व्या सीझनमध्येही दिसली आहे. या शोमध्ये ती एक स्पर्धक म्हणून दिसली आहे. या शोचा विजेता अर्जुन बिजलानी होता. या शोमध्येही श्वेता खूप चर्चेत होती. शोमध्येही ती बाकीच्या स्पर्धकांना टक्कर देत असे.

हेही वाचा :

Latest Post