अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) यांनी प्रेक्षकांच्या मनामनात त्याचे घर निर्माण केलेले आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून गेले दहा वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. त्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता भाऊ, निलेश साबळे आणि ओमकार भोजने यांच्यासोबत हसताय ना! हसायलाच पाहिजे या नवीन कार्यक्रमात दिसत आहे. चला हवा येऊ द्यामधील कलाकार वेगवेगळ्या शो मध्ये काम करत आहे. कुशल बद्रिके आता हिंदी कॉमेडी शोमध्ये काम करत आहे. भाऊ कदम याला देखील हिंदी शोची ऑफर आली होती. परंतु त्याने ती ऑफर नाकारली आणि त्या मागचं कारण त्याने मुलाखतीत सांगितलेले आहे
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम म्हणाला की, “मला देखील हिंदीची ऑफर आली होती. पण मी नाही म्हटलं .आता थांबतो मला नाही करायचं. असं मी सांगितलं. कारण इकडेही विनोद तिकडेही विनोद असं मी बोललो. पण खरं कारण तर माझा वेगळच होते. जेव्हा आमचं गॅप घ्यायचं चाललं होतं. तेव्हा मला वाटलं की, थांबा ना थोडा वेळ जरा रिलॅक्स होय. तेवढ्यात हे हिंदी करायचं म्हटलं की अवघड…मला नवीन ठिकाणी रुळायलाही जरा वेळ लागतो.”
पुढे भाऊ म्हणाला की, “हिंदीत आपल्याला मराठीत जेवढा मान मिळतो, तेवढा मिळेलच का तोही प्रश्न होता. तिथे रमायला ही वेळ लागेल. असं वाटतं ओळखीचे कोणी नाही. इथे मी साबळे असल्याने बिनधास्त असतो. तिकडे मला तो कंफर्ट नसता वाटला मराठीत कसं अगदी घरासारखं वाटतं. जेवढा मी मोकळा होऊ शकतो तसा तिकडे त्या भाषेमुळे नाही होऊ शकत म्हणून मी तो शो नाकारला.”
कुशल बद्रिके सध्या हिंदीतील मॅडनेस मचाऐंगे या कॉमेडी मध्ये काम करत आहे. त्याच्यासोबत मराठी अभिनेत्री हेमांगी कवी देखील आहे. या शोची ऑफर भाऊ कदमला देखील आली होती परंतु त्यांनी ती ऑफर नाकारली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अखेर रडत रडत आयुष शर्माने का मागितली सलमान खानची माफी?, अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
‘सैफशी लग्न करू नका नाहीतर..’ जेव्हा नातेवाईकांनी करीनाला दिला होता सल्ला, तरीही केला निकाह