Sunday, May 19, 2024

अखेर रडत रडत आयुष शर्माने का मागितली सलमान खानची माफी?, अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

अभिनेता आयुष शर्मा (Ayush Sharma) सध्या ॲक्शन-थ्रिलर चित्रपट रुस्लानमुळे चर्चेत आहे. लवयात्री या चित्रपटातून या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा हा चित्रपट चालला नाही. या चित्रपटात सलमान खानचा पैसा गुंतवण्यात आला होता. आता आयुषने याबाबत चर्चा केली आहे.

माध्यमांना मुलाखतीत तो म्हणाला, ‘मी पैशासाठी सलमान खानची बहीण अर्पिताशी लग्न केले आहे, अशी कथा सोशल मीडियाने मांडली आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी मी अर्पिताशी लग्न केले असाही माझ्यावर आरोप आहे. लोकांना माहित नाही की, मी लग्न केल्यावर सलमान खानला सांगितले होते की, मला अभिनय चालू ठेवायचा नाही. मी त्यांना म्हणालो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी 300 ऑडिशन्स दिल्या आणि दोन सुद्धा क्रॅक करू शकलो नाही. मी करू शकत नाही. तर सलमान म्हणाला होता की बेटा तुझे ट्रेनिंग चांगले नाही, मी तुला ट्रेनिंग देतो.

याशिवाय आयुष म्हणाला, “मी सलमान खानचे पैसे वाया घालवले, अशी कथा तयार करण्यात आली. मी माझा आयकर तपशील शेअर करावा का? लवयात्रीमध्ये सलमानने मला फोन केला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणालो- ‘माफ करा, मी तुमचे पैसे वाया घालवले.’ जेव्हा शेवटचे डिजिटल अधिकार विकले गेले तेव्हा मी सुटकेचा नि:श्वास सोडला. ,

आयुषच्या रुस्लान या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या चित्रपटात आयुषचा ॲक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.

सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय खूप अस्वस्थ झाले आणि चाहत्यांनाही धक्का बसला. या घटनेनंतर काही दिवसांनी सलमान खान पुन्हा कामाला लागला. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते दुबईला गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

व्हायरल फेक व्हिडिओ प्रकरणी रणवीर सिंगने केली कारवाई, पोलिसांत तक्रार दाखल
अपघातानंतर दिव्यांका त्रिपाठीने दिले तिचे हेल्थ अपडेट, चाहत्यांचे मानले आभार

हे देखील वाचा