Saturday, June 29, 2024

‘लैंगिक शोषणानंतर उद्ध्वस्त झालं आयुष्य आणि…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

मनोरंजनविश्वात पाहिले तर आपल्याला नेहमीच या क्षेत्राची इथे काम करणाऱ्या कलाकारांची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. ग्लॅमर चकाचोंध असलेल्या या इंडस्ट्रीमध्ये नेम, फेम मनी आदी सर्वच मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे साहजिकच अनेकांना या क्षेत्राबद्दल एक वेगळेच आकर्षण आणि ओढ निर्माण होते. मात्र असे असूनही जे या क्षेत्रात वावरतात त्यांनाच या इंडस्ट्रीचे सर्व चांगले वाईट फायदे माहित आहे.

वरवर सर्वांनाच भुरळ घालणाऱ्या या क्षेत्रामध्ये किती वाईट आणि विकृत लोकं आहे याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. अनेकदा आपण या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांकडून कास्टिंग काऊचबद्द्दल ऐकत असतो. याला अनेक कलाकार बळी देखील पडतात. याच कास्टिंग काऊचच्याही पुढची एक भयानक घटना एका मोठ्या अभिनेत्रींच्या बाबतीत घडली.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या भावना मेननवर काही वर्षांपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी तिने अधिकृत तक्रार देखील केली. पण दुर्दैवाने या प्रकरणाचा तिलाच त्रास होऊ लागला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. सर्वच लोकं तिच्याकडे संशयाने आणि एका वेगळ्याच नजरेने पाहू लागले. सोशल मीडियावर देखील अनेकांनी भावनांची टर उडवत तिला ट्रोल केले. परंतु तिला आता तिची गमावलेली प्रतिष्ठा परत हवी असून, यासाठी ती पुन्हा लढा देणार आहे. या घटनेनंतर तिला चित्रपटांमध्ये काम मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांचा देखील सामना करावा लागला होता.

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याबद्दल बोलणं तिचे कटू अनुभव व्यक्त केले. ती म्हणाली, “त्या एका घटनेमुळे माझ्या प्रतिष्ठेचे हजारो तुकडे झाले. या घटनेनंतर प्रत्येक व्यक्ती माझ्याकडेच संशयाने पाहू लागली. माझ्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली तर अनेकांनी मला ट्रोल देखील केले. मात्र यासर्व वेळी माझे पती आणि सर्व कुटुंबीय माझ्यासोबत होते. त्यांनी मला खूप धीर दिला. मात्र या घटनेचा माझ्या मेंदूवर खूप खोलवर परिणाम झाला. स्त्रियांवर अत्याचार करणारे लोक शिक्षा भोगून आल्यावर लगेच सामान्य जीवन जगू लागतात. परंतु ज्यांच्यावर अत्याचार होतात त्यांना आयुष्यात पुढे जगणेच कठीण होऊन बसते. समाज त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघतो. मी हे सर्व अनुभव घेतले. परंतु आता खूप झाले, मला माझी गमावलेली प्रतिष्ठा परत हवी असून, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”

भावना मेनन २०१७ साली शुटिंगवरुन घरी जात असताना तिचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान मल्याळम अभिनेता दिलीप याचे नाव पुढे आले. मात्र त्याने हे आरोप त्याने फेटाळून लावले होते. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरु आहे.

हे देखील वाचा