Friday, March 29, 2024

जेव्हा अनुपम खेर यांनी घरातूनच चोरले होते पैसे, आईने कानशिलात मारून बोलावले होते पोलीस

हिंदी चित्रपट दगतातन असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांच्या अभिनयाची लोकप्रियतेची नेहमीच चर्चा केली जाते. यापैकीच एक अभिनेते म्हणजे अनुपम खेर. अभिनेते अनुपम खेर हे हिंदी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय कलाकार आहेत. ते सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. यामाध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी अनेक किस्से शेअर करत असतात. असाच एक किस्सा त्यांनी सांगितला होता, ज्यामध्ये त्यांंना घरात चोरी करावी लागली होती. काय होते हे प्रकरण चला जाणून जाणून घेऊ.

अनुपम खेर (anupam kher) हे हिंदी चित्रपट जगतातील एक यशस्वी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली चार दशके ते आपल्या दमदार अभिनयाने या क्षेत्रात नाव कमावत आहेत, त्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आपल्याला आज पाहायला मिळतात. फक्त हिंदीच नव्हेतर अनेक इंग्लिश चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावरच अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत, मात्र त्यांचा इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, अनेक अडचणी आणि संघर्ष करुन त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. मात्र कधीकाळी त्यांच्याकडे ऑडिशन देण्याइतकेही पैसे नव्हते.यामुळेच त्यांना घरात चोरी करावी लागली होती. याचा खुलासा खुद्द अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत बोलताना केला होता. अनुपम खेर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे त्यांचे मन कधीच अभ्यासात रमले नाही. त्यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात प्रवेश घेतला होता. याचकाळात त्यांनी पंजाब विद्यापीठाची एक जाहिरात पाहिली ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑडिशन घेतल्या जात होत्या यासाठी त्यांना २०० रूपये स्कॉलरशीपही मिळणार होती मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते.

याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले होते की, “माझ्याकडे त्यावेळी भाडे देण्यासाठी पैसे नव्हते आणि मला घरी मागण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी मी हे पैसे घरातुन चोरले जे आईने देवघरात ठेवले होते. जेव्हा मी परत घरी आलो तेव्हा याच पैशाची चौकशी करण्यासाठी घरी पोलिस आले होते. पालकांनी या पैशाबद्दल मला विचारले मात्र मी माहित नसल्याचे सांगितले. मात्र काही दिवसांनी मला त्यादिवशी कुठे गेला होता असे विचारले आणि सरळा प्रकार मला सांगावा लागला. त्यावेळी आईने माझ्या आईने कानाखाली लगावली.” ही आठवण सांगताना त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचाही उल्लेख केला.(when actor anupam kher stoled money from her mothers)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रोजेक्ट के सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा गंभीर अपघात, हालचाल करणे झाले अवघड

उर्मिला मातोंडकरचे जान्हवी कपूरशी आहे खास नाते; म्हणाली, ‘तू पोटात असताना…’

हे देखील वाचा