Monday, July 1, 2024

बहुप्रतिक्षित ‘भेडिया’ चित्रपटाचा फर्स्ट लूक चाहत्यांच्या भेटीला, वरुण धवन दिसला जबरदस्त अवतारात

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आता आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. लवकरच वरुण धवन आणि क्रिती सेनन त्यांच्या ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धमाल करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक गुरुवारी (२५ नोव्हेंबर) प्रदर्शित करण्यात आला आहे.

या पोस्टरमध्ये वरुण पहिल्यांदाच हॉरर अवतारात दिसत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. आता या चित्रपटाच्या पोस्टरमुळे वरुण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोस्टरमध्ये वरुणचे डोळे ‘भेडिया’सारखे दिसत आहेत. वरुणचा हा लूक प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाची उत्सुकता वाढवू शकतो.

‘स्त्री’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘स्त्री’ प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि ‘भेडिया’ही प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, आता वरुणचे चाहते आणि चित्रपट प्रेक्षक चित्रपटाच्या टिझरची वाट पाहत आहेत. जेणेकरून या चित्रपटाविषयी कॉमेडी आणि हॉररची माहिती मिळेल. ‘भेडिया’मध्ये वरुण आणि क्रिती पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

हा हॉरर कॉमेडी चित्रपट अरुणाचल प्रदेशच्या जंगलात शूट करण्यात आला आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, निर्माते चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करत आहेत. या चित्रपटातून प्रेक्षकांना एका नव्या जगाची ओळख व्हावी, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

हा चित्रपट सध्या पोस्ट प्रोडक्शनच्या टप्प्यात आहे. चित्रपटाचे व्हीएफएक्स मूव्हिंग पिक्चर कंपनी करत आहे. यापूर्वी या कंपनीने ‘१९१७’, ‘द जंगल बुक’, ‘द लायन किंग’, ‘हॅरी पॉटर’ आणि ‘जस्टिस लीग’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर वरुण अरुणाचल प्रदेशबद्दल म्हणाला होता, “येथे काम करण्याचा माझा सर्वोत्तम अनुभव आहे.” यासोबतच तो अरुणाचल प्रदेशातील लोकांचे कौतुक करताना दिसला.

यापूर्वी वरुण धवनचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये तो अरुणाचल प्रदेशातील मुलांसोबत खेळताना दिसत होता. लहान मुलाला हातात घेऊन वरूण धवन खूपच खूश दिसत होता. २०२२ मध्ये वरुण धवनच्या ‘भेडिया’ व्यतिरिक्त ‘जुग जुग जिओ’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी क्रिती सेनन अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ आणि प्रभाससोबत ‘आदिपुरुष’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

-ग्लोबल ट्रेंडिंग कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होती पांढरे

हे देखील वाचा