भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेचा बिनधास्त डान्स, चाहते काय अभिनेतेही झाले घायाळ


आम्रपाली दुबे हे भोजपुरी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव. काही वर्षांपूर्वींच आम्रपालीने भोजपुरी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. तेव्हापासूनच तिची घौडदौड सुरू आहे. उत्कृष्ट अभिनय, डान्स आणि आपली एक वेगळीच अदा याच्यामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आणि युट्युबवरील तिची अनेक गाणी आवडणाऱ्या लोकांचा आकडा पाहिला तर तिची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

सन २०१४ मध्ये ‘निरहुआ हिंदुस्तानी’ या भोजपुरी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. हा चित्रपट खूपच हिट झाला आणि आम्रपाली रातोरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांत मधून ऑफर यायला सुरवात झाली.

सोशल मीडियावर आम्रपाली फारच सक्रिय असते असते. आपले नवनवीन व्हिडिओमार्फत ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात ती ‘भाभीजी सारी सारिया लिजीए’ या गाण्यावर जोरदार ठुमके लावताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये ती आपल्या मस्त आणि मोहक अशा अंदाजात नाचत आहे आणि त्यात तिच्या बॅकग्राउंडमध्ये दोन तरुण दिसत आहेत, त्यातील एक तिला इशारा करून तिचा नाच खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.

आम्रपालीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेयर केला आणि त्यात लिहिले की, “या दोघांना माझी रील खराब करायची आहे, पण मी सुद्धा ऐकणारी नाही.” तिच्या या व्हिडिओवर भोजपुरी सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता अरविंद अकेला कल्लू यांनीसुद्धा मजेदार भाष्य केले आहे. त्याने प्रतिक्रियेत लिहिले की, ‘हम आते है दोनो लोगो से फरीयाने’…

भोजपुरी अभिनेता पवन सिंग सोबत ‘सत्या’ या चित्रपटासाठी आम्रपालीने एक सॉंग शूट केले होते ‘रात दिया बुताके’ असे हे बोल असलेले गाणे तुफान गाजले. या गाण्याने लोकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली होती. कारण युट्युबवर १० कोटींचा आकडा आजवर या गाण्याव्यतिरिक्त कोणत्याच भोजपुरी गाण्याला गाठता आला नाही. याव्यतिरिक्त तिचा होळी वरील गाणं नुकतच लॉन्च करण्यात आलं. या गाण्याने लॉन्च होताच सोशल वर धुमाकूळ घातला आणि काही तासात या गाण्याला लाखोंच्यावर व्युज मिळाले आहेत. हे गाणे भोजपुरी गायिका खुशबू जैन हिने गायले आहे.

आम्रपालीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘रहना है तेरे पलको के छाव मे’ या पहिल्या हिंदी मालिकेद्वारे केली. याशिवाय मालिका आणि सात फेरे या मालिकेमध्ये ती झळकली आहे. टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असताना तिला भोजपुरी इंडस्ट्रीतून ऑफर आली आणि त्यानंतर तिने आपला मोर्चा तिकडे वळवला. यानंतर पटना से पाकिस्तान, राजा बाबू,बम बम बोल रहा है, काशी हे तीचे चित्रपटही हिट झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.