×

एयरपोर्टवर फोटो काढणाऱ्यांवर भडकला सलमान खान, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेता सलमान खान ( Salman Khan )दुबईमध्ये त्याच्या दबंग टूरमध्ये खूपच व्यस्त होता. त्याच्या या दबंग टूरमध्ये सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha) पूजा हेगडे (pooja hegde) असे अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. दुबईमध्ये भाईजानच्या तुफान लोकप्रियतेची झलक सगळ्यांना पाहायला मिळाली होती. यावेळी प्रचंड मोठा चाहता वर्ग पाहायला मिळाला होता. ही टूर संपवून सलमान खान विमानतळावर त्याचे फोटो काढणार्‍या माध्यमांवर संतापलेला दिसला. नेमका काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊ.

अभिनेता सलमान खान त्याची दुबई टूर संपवून विमानतळावर दाखल झाला होता. विमानतळावरून त्याच्या गाडीकडे जाताना समोर आलेल्या कॅमेरावाल्यांनी त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला मात्र सलमान खान प्रचंड रागात असलेला दिसला. त्यावेळी त्याने फोटो काढायला सुद्धा मनाई केली होती. त्याच्या बॉडीगार्डने या कॅमेरामनला थांबवत आता फोटो काढणे बंद करण्यास सांगितले. मात्र तरीही त्याने फोटो काढल्याने सलमान खानचा पारा चढला. त्यामुळेच त्याने रागाने त्या कॅमेऱ्याकडे पाहिले ज्यामुळे तो चांगलाच घाबरून गेला. सलमान खानच्या रागाने तो कॅमेरामन मात्र शांतपणे निघून गेला.

तत्पूर्वी भाईजानच्या या रागामागचे कारण समोर आले असून विमानतळावर झालेल्या गैरसोयीने तो संतापला असल्याचे समजत आहे. समोर आलेल्या बातमीनुसार सलमान खान नेहमीच विमानतळावरून B गेटने नेहमी बाहेर पडतो. कारण तिथून गाडीपाशी जायला खूप कमी चालावे लागते. मात्र यावेळी त्याला A गेटने बाहेर पडावी लागले. त्यामुळे सलमान खानला गाडीपाशी पोहोचायला बरेच अंतर चालावे लागले. त्यामुळेच तो खूप संतापला होता. कारण आधीच लांबचा प्रवास करून आलेला सलमान खान खूप थकला होता. त्यामुळे तो खूपच चिडला होता.

हेही वाचा –

जेव्हा रागाच्या भरात सलमान खानने निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या अंगावर भिरकावली डायरी तेव्हा…

जेव्हा भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे बनली बंगाली बाला, तेव्हा तिला पाहून फॅन्स म्हणाले…

प्रेग्नन्सीच्या काळातही काजल अग्रवालने केला जिममध्ये व्यायाम, सोबतच दिल्या ‘या’ दिवसांमध्ये फिट राहण्याच्या टिप्स

Latest Post