Sunday, May 19, 2024

नुसते स्टार नाहीत सुपरस्टार आहेत ‘हे’ भोजपुरी कलाकार, एकेवेळी जेवणाला महाग असलेले हे अभिनेते राहतात करोडोंच्या घरात

भारतीय सिनेमांच्या इतिहासातील पहिला सिनेमा मराठीत तयार झाला हॊता. त्यानंतर हळूहळू हे प्रस्थ वाढू लागले आणि हिंदीमध्येही अनेक सिनेमे सुद्धा बनवले जाऊ लागले. आपला देश हा विविध भाषा, बोलींसाठी ओळखला जातो. असे म्हणतात की आपल्याकडे म्हणतात दर १० किलोमीटरवर भाषा बदलत जाते. हाच विचार समोर ठेऊन अनेक लोकांनी अथक परिश्रम करत आपापल्या प्रांतांसाठी चित्रपटाची निर्मिती करायला सुरुवात केली.
त्यातून प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांची निर्मिती सुरु झाली. यात मराठी, गुजराती, दाक्षिणात्य आदी अशाच अनेक चित्रपटसृष्टीचा समावेश असून या सिनेसृष्टी प्रचंड प्रसिद्ध आणि लोकप्रिय देखील आहे. आता यासर्वांमधे हळूहळू अजून एका सिनेसृष्टीचे नाव समाविष्ट होत आहे आणि ते नाव आहे भोजपुरी चित्रपटसृष्टीचे.

१९६३ साली पहिला भोजपुरी सिनेमा तयार झाला. मात्र पाहिजे तशी ओळख या इंडस्ट्रीला मिळत नव्हती. मग या भोजपुरी सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला. त्यातूनच रवी किशन, मनोज तिवारी, मोनालिसा आदी चांगले कलाकार आपण पाहिले. याच कलाकारांमुळे भोजपुरी सिनेमासृष्टीला सुगीचे दिवस आले. त्यानंतर ही इंडस्ट्रीदेखील हळूहळू संपूर्ण देशात ओळखली जाऊ लागली. आज ह्या इंडस्ट्रीची सातासमुद्रापार करुन देण्याचे काम करत, भोजपुरी गाणे.

या भोजपुरी गाण्यांनी अनेक प्रादेशिक कलाकरांना संपूर्ण जगभर ओळख मिळून दिली. शिवाय जे कलाकार अगदी हलाखीच्या परिस्थितीतून आले होते, त्यांना आज करोडपती बनवले आहेत. नक्कीच यात त्या कलाकारांची मेहनत होतीच. याच मेहनतीच्या जोरावर आज हे कलाकार त्याचे जीवन ऐशोआरामात जगात आहेत. आज या लेखातून आपण अशाच काही कलाकारांची नावे जाणून घेणार आहोत.

पवन सिंह:

‘लॉलीपॉप लागेलु’ मधून एकरात्रीत ‘पवन सिंग’ सुपरस्टार झाला. त्याचे जीवनही नेहमी चर्चेचा विषय असतो. पवनसिंग हा भोजपुरी इंडस्ट्रीमधला एक मोठा अभिनेता आणि गायक म्हणून ओळखला जातो. भोजपुरी गाण्यांचे आणि चित्रपटाचे शौकीन असलेले सर्व लोक त्याच्यासंबंधित लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व गोष्टी जाणून घेतात. आलिशान जीवन जगणारा पवनसिंग मुंबईत राहत असून, त्याला बाईक्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान आणि महागड्या बाइक्सचे कलेक्शन आहे.

निरहुआ :

अनेक गाण्यांमध्ये अभिनयाची आणि गायनाची ताकद दाखवणारा हा सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आम्रपाली दुबईसोबत रोमान्स करताना पाहतो, मात्र खऱ्या आयुष्यात तो विवाहित असून त्याच्या पत्नीसोबत सुखात जगात आहे. कधी काळी काही रुपयांसाठी भटकणारा निरहुआ आज करोडो रुपये कमावत आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि घरं आहेत.

खेसारी लाल यादव :

मूळचा छपराचा असणारा खेसरी लाल यादव हा देखील भोजपुरी सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेता आणि गायकआहे. स्टार होण्याआधी खेसरी आणि त्याची पत्नी दिल्लीमध्ये लिट्टी चोखाचे दुकान चालवायचे. आता तो एकेका गाण्यासाठी, चित्रपटासाठी लाखो रुपये घेतो. त्याचे मुंबई सोबतच पाटणा येथे देखील घर आहे.

रवि किशन :

१६६९ साली मुंबईत जन्म झालेला हा कलाकार कोणासाठीच अनोळखी नाही. त्याने फक्त भोजपुरी नाही तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वतःला त्याने फक्त भोजपुरीसाठी मर्यादित ठेवले नाही. कधी बसच्या तिकिटाचे पैसे नसणारा रवी किशन आज करोडोंमध्ये खेळत आहे.

हे देखील वाचा