भोजपूरीच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आकांक्षा दुबे होय. आकांक्षा तिच्या डान्स व्हिडिओमुळे अनेकदा चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे डान्स व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. आकांक्षाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरच्या ‘बेबो मैं बेबो’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आकांक्षा बऱ्याचदा गाण्यांवर ठुमके लावताना दिसते. मग तो तिचा कोणताही डान्स व्हिडिओ असो किंवा एखादे नवीन भोजपुरी गाणे असो. नुकताच आता तिने ‘बेबो’ बनून चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. ‘बेबो’चा लूक तिला अतिशय शोभून दिसत आहे आणि या हिंदी गाण्यावरील तिचा अभिनयही अप्रतिम आहे. तिचा डान्स पाहून सोशल मीडिया युजर्सही चकित झाले आहे. या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. यात आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आकांक्षाने करीनाची हुबेहूब कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.
डान्स करत असताना आकांक्षाने वन साइड ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच तिने हाय हील्स घातले आहे. ती या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत आहे. आकांक्षाने याआधीही तिचे अनेक डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत. तिच्या चाहतेही तिच्या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद देत असतात इंस्टाग्रामवर आकांक्षाचे जवळपास सहा लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.
आकांक्षाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अलीकडेच तिचे समर सिंगसोबत ‘दिल कबो तोडब ना’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळाला. त्यांचा व्हिडिओ आतापर्यंत दोन दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे समर सिंग आणि खुशबु तिवारी यांनी गायले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ