Saturday, April 20, 2024

‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री कडगावकर. तिने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. धनश्री देखील इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांना तिच्याबाबत माहिती देत असते. अशातच धनश्रीचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

धनश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘दिल को करार आया’ या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. धनश्रीच्या लूकमध्ये आता खूप बदल आला आहे. या लूकमध्ये देखील ती खूप सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून एक कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, “हे गाणे मला खूप आवडते.” तिचे चाहते देखील व्हिडिओवर प्रतिसाद देत आहेत.

धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका निभावली होती. या भूमिकेने तिला खूप ओळख दिली. तिला ‘वहिनीसाहेब’ ही ओळख या भूमिकेने दिली आहे. नकारात्मक भूमिकेत असूनही तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. परंतु काही दिवसांनी गरोदर असल्याने तिने ही मालिका सोडून दिली. धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या मुलाचे नाव तिने कबीर असे ठेवले आहे. कबीरच्या बारसाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. धनश्रीने या आधी ‘चिठ्ठी’, ‘ब्रेव हार्ट’, ‘गंध फुलाचा गेला सांगून’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा