Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘समर सिंगला फाशी द्या…’, म्हणत आकांक्षा दुबेच्या आईने योगी सरकारकडे केली न्यायाची मागणी

भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यू प्रकरणी आकांक्षाच्या आईने राज्याचे सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागितला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी समर सिंग आणि संजय यांच्यासह हॉटेल मालकाला अटक करावी, अशी अभिनेत्रीच्या आईची मागणी आहे.

शनिवारी (दि. 25 मार्च) रोजी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह सापडला होता. या दु:खाच्या काळात त्याच्या घरी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ आहे. अशात अभिनेत्री अक्षरा सिंगहिने अभिनेत्रीच्या वडिलाेपार्जित घरी जाऊन कुंटुंबाचे सांत्वन केले. मात्र, आकांक्षाचे कुटुंबीय ही आत्म’हत्या मानायला तयार नाहीत. अभिनेत्रीची आई सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी मागणी करत आहे. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून त्यांच्या मुलीला न्याय द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली असून निर्माते समर आणि संजय सिंग यांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. मधू यांनी सांगितले की, “माझी मुलगी आत्म’हत्या करू शकत नाही. तिचा खून झाला आहे. कारण, चित्रपट निर्मात्याकडे तिचे तीन वर्षांपासून कामाचे कोट्यवधी रुपये थकीत होते. आकांक्षाने मला सांगितले हाेते की, ‘समरकडून तिचा सतत छळ केला जातो. कोणाशीही काम करू नये म्हणून तो तिच्यावर दबाव टाकताे’ आणि यासाेबतच त्या रात्री तो तिच्या खोलीतही होता.” असे अभिनेत्रीच्या आईचे म्हणणे आहे. अभिनेत्रीच्या आईने नाराजी व्यक्त करत सांगितले आहे की, “हाॅटेलची सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिली जात नाही ते आमच्यापासून लपवली जात आहे.”

आकांक्षाच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुटुंबीय ही आत्म’हत्या मान्य करायला तयार नाहीत. तिची हत्या करून फाशी देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वडिलांनी सांगितले की, ‘माझी मुलगी आत्म’हत्या करू शकत नाही, तिला मारण्यात आले आहे.'(bhojpuri actress akanksha dubey suicide mother madhu dubey appealed to yogi adityanath for justice )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सावधान! फिल्म इंडस्ट्रीत कोरोनाचा कहर, अभिनेत्री माही विजसह राज कुंद्रा काेविड पॉझिटिव्ह

इंडस्ट्रीत ‘काॅर्नर’मध्ये टाकल्याच्या वक्तव्यावर प्रियांकाच्या मॅनेजरने साेडले माैन; म्हणाली, ‘अखेर तू…’

हे देखील वाचा