Monday, October 14, 2024
Home भोजपूरी मोठी बातमी! ‘आकांक्षा दुबेची हत्याच’, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! ‘आकांक्षा दुबेची हत्याच’, धक्कादायक माहिती समोर

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह वाराणसीमधील हॉटेलमध्ये रविवारी(दि. 26 मार्च)ला आढळून आला. आकांक्षा दुबे भोजपूरी मनोरंजनसृष्टीतील एक नावाजलेले नाव हाेते. तिने आत्म’हत्या केल्याची माहिती पाेलीसांनी दिली. तिच्या आत्म’हत्येमुळे कलाविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र, आता या प्रकरणात अभिनेत्रीची आई मधू यांनी, गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग याच्यावर आराेप करत त्यांनी आकांक्षाची हत्या केली असल्याचं म्हणटले आहे.

मधू यांनी सांगितले की, “गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांनी माझ्या मुलीचे काेट्यवधी रुपये दिले नव्हते. यासाेबतच संजयने माझ्या लेकीला जीवे मारण्याची धमकीही दिली हाेती.”

साेशल मीडियावर रील्समधून प्रसिद्धी मिळवलेल्या आकांक्षा (akanksha dubey) हिने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिच्या आत्म’हत्येच्या बातमीने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आकांक्षा सोशल मीडियावर नियमित सक्रिय असायची. आकांक्षाने अनेक दमदार चित्रपटांत काम केलं आहे, ज्यामध्ये ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की 2’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. म्हत्वाचे म्हणजे रविवार (दि. 26 मार्च)ला आकाक्षांचे भाेजपूरी अभिनेता पवन सिंगसाेबत ‘आरा कभी हारा नही’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

आकांक्षाचा जन्म मध्य प्रदेशातील मिर्जापूर येथे 21 ऑक्टोबर 1997 साली झाला होता. मात्र, तीन वर्षांची असताना ती मायानगरी मुंबईत आली होती. तिच्या आई-वडिलांना तिला आयपीएस अधिकारी बनवायचे होते, पण आकांक्षाची आवड नृत्य आणि अभिनय क्षेत्रात अधिक होती. त्यामुळे तिने अभिनय क्षेत्रात करियर बणवण्याचा निर्णय घेतला.(Bhojpuri actress Akanksha Dubey’s mother alleges, ‘Sameer Singh killed my daughter’)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरील खलनायक ‘असा’ बनला अभिनेत्री रेणुका शहाणेच्या जीवनातील नायक; पत्राद्वारे जिंकलं होतं मन

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट, म्हणाला

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा