Tuesday, March 5, 2024

सावधान! फिल्म इंडस्ट्रीत कोरोनाचा कहर, अभिनेत्री माही विजसह राज कुंद्रा काेविड पॉझिटिव्ह

सण 2020मध्ये सुरू झालेला कोरोना व्हायरस पुन्हा एकदा देशभरात आपले पंख पसरवत आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हा विषाणू आता चित्रपटसृष्टीतही पोहोचला आहे. याआधी किरण खेर आणि पूजा भट्ट या अभिनेत्री त्याच्या कचाट्यात आल्या हाेत्या. त्याचवेळी आता टीव्ही अभिनेत्री माही विजही कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे.

माही विज (mahhi vij) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक व्हिडिओ टाकला आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने म्हटले की, ‘मी कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिझल्ट येऊन चार दिवस झाले आहेत. मला ताप आणि इतर लक्षणे दिसू लागताच मी काेविड चाचणी केली. सर्वांनी मला असे करू नकाे, फ्लू आहे, हवामान बदलत आहे, असे सांगितले. परंतु मला फक्त सुरक्षित राहायचे आहे. कारण, घरी मुले आहेत. त्यामुळे माझी चाचणी झाली आणि माझा रिझल्ट कोविड पॉझिटिव्ह आला.’

माहीने पुढे सांगितले की, “सध्या ती तिच्या मुलांपासून दूर आहे. अशा स्थितीत ते रडत आहेत. ती म्हणते, ‘मला मम्मा हवी आहे.’ खुशी मला कॉल करते आणि म्हणते, ‘मम्मा मी तुला मिस करत आहे.’ हे पहिल्या कोविडपेक्षा जास्त धोकादायक आहे. मला काही दिवस श्वास घेता येत नव्हता, जो कोविडमध्ये यापूर्वी झाला नव्हता. मी एवढेच म्हणेन की सुरक्षित रहा. खूप बेफिकीर राहू नका. कारण, आपल्यामुळे आपल्या पालकांना किंवा मुलांना या विषाणूची लागण हाेऊ शकते.”

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा देखील या व्हायरसचा बळी ठरला आहे. याबाबतची माहिती पॅपराझींनी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत दिली. अशात राजकुंद्रा त्याच्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या आराेग्याची काळजी घेत आहे. (tv actress mahhi vij covid positive shared video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा