‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली ओळख

0
188
Photo Courtesy: Instagram/shivaaji_satam

टेलिव्हिजनवरील सर्वांचा आवडता शो म्हणजे ‘सीआयडी’ होय. या शोमधील सर्वच पात्र प्रेक्षकांना खूप आवडली होती. यातील सर्वांचे एक आवडते पात्र म्हणजे सिनियर इन्स्पेक्टर अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव. आदित्य गुरुवारी (21 जुलै) त्याचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी…

आदित्य श्रीवास्तव याचा जन्म 21 जुलै, 1968 साली इलाहाबाद उत्तरप्रदेश येथे झाला होता. त्याचे वडील मिस्टर डी.एन. श्रीवास्तव एक बँकर होते. आदित्यने त्याचे शिक्षण सुल्तानपूर आणि इलाहाबादमध्ये पूर्ण केले आहे. (CID fame actor Aditya Shrivastava celebrate his birthday let’s know about him)

इलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदित्यला संगीत समितीमध्ये थिएटर करण्याची संधी मिळाली. त्याला हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी शेखर कपूर यांच्या ‘बॅटिंग क्वीन’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्याने पुत्तीलाल ही भूमिका निभावली होती. 1995 मध्ये मुंबईला आल्यानंतर आदित्यने अनेक टीव्ही कमर्शियल खाली ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून काम केले आहे. आदित्यने ‘ब्योमकेश बक्शी’, ‘रिश्ते’, ‘नया दौर’, ‘ये शादी नहीं हो सकती’, ‘आहट’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivaji Satam (@shivaaji_satam)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सीआयडीबाबत सांगितले होते. त्याने सांगितले की, “सीआयडीच्या दुसऱ्या सिझनची चर्चा चालू आहे. शोचे निर्माते मध्ये मध्ये मला सांगत असतात की, तुम्ही लोक तयार राहा. आम्ही दुसऱ्या सिझनला एका नव्या रुपात घेऊन येणार आहे.”

आदित्य श्रीवास्तव हा हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि टेलिव्हिजनच्या दुनियेतील एक उत्तम थिएटर आर्टिस्ट आहे. सीआयडी या मालिकेतील अभिजीत या पात्राने त्याला घराघरात पोहोचवले आहे. टीव्ही सोबतच त्याने अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. त्याने ‘सत्या’, ‘गुलाल’, ‘पांच’, ‘ब्लॅक’ आणि ‘दिल से पुछ किधर जाना है’ या चित्रपटात काम केले आहे. तो शेवटचा ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अश्लील म्हटल्याबद्दल जान्हवी कपूरला वाटते चिंता; म्हणाली, ‘अशा प्रश्नांमुळे माझं चारित्र्य…’

ललित मोदींसोबतच्या नात्यावरून ट्रोल झालेल्या सुष्मिता सेनने शेअर केला ‘असा’ फोटो, स्माईलने दिलं उत्तर

‘मी आत्महत्या…’, तनुश्री दत्ताच्या ताज्या पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here