रंगांचा उत्सव रंगपंचमी हा दरवर्षी देशभर साजरा केला जातो. या दिवशी लोक केवळ रंगानेच खेळत नाहीत तर होळीच्या गाण्यांवर नाचतात देखील. कदाचित याच कारणास्तव होळीची अनेक गाणी पूर्वीच रिलीज झाली आहेत आणि बरीच गाणी रिलीज होणारही आहेत. भोजपुरी गायक तर यात आघाडीवर आहेत. या इंडस्ट्रीमध्ये होळीला किंवा रंगपंचमीला खूप महत्त्व दिले जाते. याचेच औचित्य साधून अनेक गाणी याच मुहूर्तावर युट्यूबच्या माध्यमातून रिलीज होतात.
आता याच भोजपुरी भाषेत अलीकडेच एक गाणे आले आहे, त्याचे नाव ‘चंपक होली’. या गाण्याला अंतरा सिंगबरोबर चंदन चंचल यांनी गायले आहे. एकीकडे खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांची गाणी येत आहेत. तर दुसरीकडे या मोठ्या गायकांव्यतिरिक्त अंतरासिंग प्रियंकाचे नवीन होळीगीत ही रिलीज झाले आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या गाण्याला खूप पसंती दिली आहे.
या गाण्यात एकीकडे भोजपुरी ग्रुप होळीगीत आहे, तर दुसरीकडे त्यात धमाकेदार म्युझिकचाही समावेश आहे. हे गाणे ऐकल्यानंतर तुमचा मूडही रंगीबेरंगी होईल. हे होळीचे गाणे म्युझिक वाइडने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केले आहे. गाणे सोनू सरगम आरा यांनी लिहिले आहे. त्याचबरोबर संगीत रोशन सिंग यांचे असून संकल्पना मुकेश साहनी यांची आहे. गाण्याचे निर्माते नीरज सिंग आणि दिग्दर्शक मुरली आहेत.
चंदन चंचल आणि अंतरासिंग प्रियंका यांचे चाहतेही या गाण्यावर प्रतिक्रिया देत आहेत. सुमन सौरभ नावाच्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, “चंदन चंचलचे गाणे बऱ्याच दिवसांनंतर आले, पण उत्कृष्ट आहे.” त्याचवेळी गुड्डू नावाच्या वापरकर्त्याने लिहले की, “होळीच्या खास गाण्याची वेळ आहे आणि या गाण्याने धमाल केली आहे. त्याचवेळी सुखराम चंद्राने लिहिले आहे की, “चंदन आणि अंतरा यांच्या आवाजात हे होळीचे खूप सुंदर गाणे आहे. हा व्हिडिओ पाहून मजा आली.”