आपल्या अभिनय आणि गायनाने भोजपुरी इंडस्ट्रीत छाप पाडणारा पवन सिंग कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. अॅक्शन चित्रपट असोत किंवा म्युझिक अल्बममधली गाणे तो नेहमीच त्याच्याअभिनयाने सर्वांनाच मोहित करत असतो. त्यामुळेच सगळे वर्षानुवर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्याने अनेक नवीन गाणी लाँच केली असली तरी त्याची काही जुनी गाणी देखील यूट्यूबवर ट्रेंड करत आहेत. त्याचे एक भोजपुरी गाणे रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज करत आहे ज्यामध्ये तो अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबत डान्स आणि रोमान्स करताना दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, भोजपुरी अभिनेता पवनसिंग सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. पवन सिंग आणि आम्रपाली दुबे यांच्या ‘सत्या’ चित्रपटातील ‘राते दिया बुटाके’ या गाण्याबद्दल जे यूट्यूबवर प्रचंड गाजले आहे. या दोघांचे हे सुपरहिट गाणे चाहत्यांना खूप आवडते. पॉवर स्टारने इंदू सोनालीच्या सहकार्याने गायलेले चित्रपटातील हे गाणे नोव्हेंबर २०१७ मध्ये Wave Music च्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रदर्शित झाले. आतापर्यंत याला 55 कोटी म्हणजेच 550 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
‘राते दिया बुटा के’ व्हिडिओमध्ये आम्रपालीचा डान्स आणि पवन सिंगसोबतचा तिचा रोमान्स पाहून भोजपुरी प्रेक्षक वेडे होत आहेत. बऱ्याच दिवसांनंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे ब्लॉकबस्टर होण्याचे एक कारण म्हणजे स्टार कास्टमधील बोल्ड रोमान्स आणि कामुक स्टेप्स. आम्रपालीची जोडी सहसा निरहुआसोबत जास्त पसंत केली जाते, परंतु या गाण्यात तिने पॉवर स्टारसोबतही लोकांना प्रभावित केले. व्हिडिओमध्ये पवन सिंग बनियान आणि ट्राउजरमध्ये दिसत आहे, तर त्याची अभिनेत्री गुलाबी रंगाची भारी साडी परिधान केलेली दिसत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हेही वाचा – आनंदाची बातमी! ‘साथ निभाना साथिया’मधील ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनणार, हटके अंदाजात केली घोषणा
लोकप्रिय टिव्ही अभिनेत्रीने घेतला सन्यास, २७ वर्षाची यशस्वी कारकिर्द सोडून जाणार हिमालयात
चंद्राच्या नजाकतींनी चाहते घायाळ