भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंग ही नेहमीच चर्चेत असते. तिने गायलेले प्रत्येक गाणे सुपरहिट होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांचा तिला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. नुकतेच तिचे ‘किट कॅट जवानी’ है नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या नवीन गाण्याने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये आग लावली आहे. तिचा हॉट अंदाज यामध्ये दिसत असून चाहत्यांची या गाण्याला पसंती मिळाली आहे.
हे गाणे खूप मजेदार आहे. अक्षरा सिंग हिने तिच्या आवाजात हे गाणे गायले आहे. जाहिर अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर विनय विनायक यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. ‘किट कॅट जवानी’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे गाणे नव भोजपुरी यूट्यूब चॅनलवरून प्रदर्शित केले आहे. या गाण्याला दर्शकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अक्षरा सिंगने तिच्या फेसबुक पेजवरून या गाण्याचा डान्स व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्या प्रकारे या गाण्याला सगळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून अक्षरा सिंग असे म्हणत आहे की, “हे गाणे मनोरंजन आणि रोमान्सने भरलेले आहे.” तिने सांगितले की, “हे गाणे नक्की पाहा आणि ऐका. तुम्हाला नक्की आवडेल.”
भोजपुरी गाणे ‘किट कॅट जवानी’ हे अक्षरा सिंगने गायले आहे तसेच या गाण्याच्या व्हिडिओमध्ये देखील तिने कमालीचा परफॉर्मन्स दिला आहे. त्यामुळे या गाण्याला आणखीनच रंगत आली आहे. सोशल मीडियावर अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून अक्षरा सिंगच्या आवाजाचे आणि तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत. तसेच आगामी काळात तिच्याकडून अशीच नवनवीन गाणी ऐकायला मिळतील अशी आशा व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…